पूर्णानगरीत नेत्रतपासनी व मोफत चष्म्याचे वितरण
विना कागदपत्रे मोफत चष्मा वाटप
प्रतिनिधी – सतीश वानखडे
अमरावती :- भातकुली तालुक्क्यातील पूर्णा नगर येथे अमरावती जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार मा. सौ.नवनीत राणा यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी व मोफत चष्म्याचे वितरण करण्यात येत आहे.
दिनांक 26 रविवारला वेळ सकाळी 10:00 ते 5:00 पर्यंत पूर्णा नगरीत ग्रामपंचायत येथे अमरावतीच्या खासदार मा. नवनीतजी राणा यांच्या सौजन्याने ग्रामपंचायत सदस्य व युवा शक्ती मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन आपले नेत्र तपासनी करून घेण्याची विनंती आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. तसेच चष्मा आवश्यक असेल अश्या नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालय पूर्णा नगर येथून दिनांक 6/04/2023 ला कुठलेही कागदपत्र न देता मोफत चष्मा वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या तपासणी शिबिराचे आयोजन युवा शक्ती मित्र मंडळाकडून करण्यात आले असून विशेष सहकार्य म्हणून विनोद भाऊ जायलवाल यांच्या सहकार्यने होत असल्याचे सांगण्यात आले आहे.