डॉ.मेघनाथ शहा चे विचार समाजासाठी प्रेरणादायी– प्रा. प्रेमानंद हटवार
विदर्भ तेली समाज महासंघातर्फे डॉ .मेघनाथ शहा यांची जयंती उत्साहात साजरी
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर येथे समाज भूषण खगोलशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ शहा यांची जयंती मोठ्या उत्सावात साजरी करण्यात आली.डॉ.मेघनाद साहा यांचा जन्म (६ ऑक्टोबर १८९३ – १६ फेब्रुवारी १९५६) हे भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ होते . ज्यांनी थर्मल आयनीकरणाचा सिद्धांत मांडण्यास मदत केली . त्याच्या शहा आयनीकरण समीकरणाने खगोलशास्त्रज्ञांना ताऱ्यांचे वर्णक्रमीय वर्ग त्यांच्या वास्तविक तापमानाशी अचूकपणे जोडण्याची परवानगी दिली.
खगोल भौतिकशास्त्रातील दहा सर्वात उल्लेखनीय शोधांपैकी शहा यांचे समीकरण महत्वाचे मानले जाते.डॉ.मेघनाथ शहा एक जगविख्यात शास्त्रज्ञ ,राजकीय, सामाजिक , अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे महान व्यक्तिमत्त्व होते.
या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित विदर्भतेली समाज महासंघांचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजयभाऊ शेंन्डे,सचिव संजय सोनटक्के,नागपूर शहर अध्यक्ष सुरेश वंजारी यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.अँड रमेश पिसे यांनी डॉ.मेघनाथ शहा यांच्या जीवनकार्य आणी वैज्ञानिक संशोधनावर प्रकाश टाकला तर प्रा.प्रेमानंद हटवार यांनी डॉ.मेघनाथ शहा यांच्या वैज्ञानिक व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल माहीती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शेंन्डे तर संचालन संजय सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन नागपूर शहर अध्यक्ष सुरेश वंजारी यांनी केले.
त्यावेळी उपस्थित आनंद नासरे ,कृष्णाजी बेले,राजेंद्र डकरे,ज्ञानेश्वर लांजेवार, पुरुषोत्तम कामडी,शंकर ढबाले, मिराताई मदनकर,जानकीताई सेलूकर, वसंत शेंडवरे, साखरे साहेब ,रामभाऊ मसतकर ,मधुकर वाडीभस्मे, विजय डाफडे , रविंद्र बावनकर, कमलाकर राजूरकर, अरुण आष्ट्णकर,महादेव बालपांडे,आणि इतर सर्व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.