संशयाने मनात घर केले आणि त्याने तरुणाला संपवले
शरीराचे पाच तुकडे करून घरातच पुरले
मुंबई / नवप्रहार मीडिया
एकदा काय शंकेने मनात घर केले तर मग तो वाढतच जातो. आणि त्यामुळे अशी काही घटना घडते की ज्या नंतर मनुष्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उपाय नसतो. शफीक सोबतही असेच झाले. त्याला शंका होती की त्याच्या पत्नीच्या माणलेल्या भावा सोबत पत्नीचे अनैतिक संबंध आहेत.आणि त्या मानसिकतेने त्याने 17 वर्षीय तरुणाचा खून केला. व मृतदेहाचे पाच तुकडे करून तो घरातच पुरला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शफीक अहमद अब्दुल मलिक शेख असे आरोपीचे नाव आहे. शफीक च्या सासऱ्याने ईश्वर भगवान आव्हाड नावाच्या मुलाचा लहान पणापासून सांभाळ केला होता. ते ईश्वर ला आपला मुकगा मनात होते. तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य ईश्वर ला भावा प्रमाणे प्रेम देत होता. दरम्याम शफीक च्या सासऱ्याने आपल्या मुलिसोबत शफीक चे लग्न करून दिले.
ईश्वर लहान पणापासून शफीक च्या बायको सोबत राहिल्याने तो तिला बहीण मनात होता. तर ईश्वर आपल्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहे असा शफीक ला संशय होता. त्यामुळे त्याने ईश्वर चा खून करून पकडल्या जाऊ नये म्हणूंन त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून ते घरातच पुरले.
शफीक च्या सासऱ्यांनी केली विचारणा – ईश्वर दोन दिवसांपासून आढळून नविन आल्याने शफीक च्या सासऱ्यांनी त्याला ईश्वर बद्दल विचारणा केली. त्यावर शफीक ने त्याला माहित नसल्याचे उत्तर दिले. शफीक च्या सासऱ्यांनी त्याला ईश्वर तुझ्या सोबतच गेला होता असे ठणकावून सांगत पुन्हा विचारणा केली. त्यावेळी त्याने ईश्वर चा खून करून मेउतदेह घरातच पुरून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर शफीक च्या सासऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
मुंबईच्या आरसीएफ पोलिसांनी आरोपी शफीक अहमद विरुद्ध आयपीसीच्या कलम 302 आणि 201 कलमातंर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्याला अटक केली आहे. पोलिसांकडून शफीकची चौकशी सुरु आहे. प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस कसून तपास करत आहेत.