हटके

वाचा या गावातील मुलींची विक्री झाल्याची का व्यक्त करण्यात येत आहे शंका

Spread the love

एकाच गावातील विवाहिता आणि तीन तरुणी पळाल्याने खळबळ 

गावात विविध चर्चेला उधाण 

वाशीम / नवप्रहार वृत्तसेवा

                 जिल्ह्यातील अनसिंग ठाण्याच्या हद्दीतील सोंडा या गावातील एक विवाहित महिला आणि तीन तरूणी 13 जुलै पासून गावातून फरार आहेत.या घटनेने गावात खळबळ माजली आहे.

                         याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोंडा येथील गंगाबाई एकनाथ खंडागळे यांनी अनसिंग पोलिस ठाण्यात १३ जुलै रोजी रात्री दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांची सून साक्षी अविनाश खंडागळे (वय १८), निकीता संतोष मोरे (वय २०) आणि कोमल बाळू तायडे (वय १६) या तिघीही १३ जुलै रोजी दुपारी दोन वाजता घरून शौचास जातो म्हणून गेल्या होत्या.

त्यानंतर तीघीही त्या दिवशी रात्री पर्यंत घरी परत आल्या नाहीत.  गावामध्ये व परिसरामध्ये त्यांचा शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत. या प्रकरणी अनसिंग पोलिस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची सोंडा गावामध्ये उलट सुलट चर्चा आहे. फरार झालेल्या तिघीही सोंडा गावातून पाऊलवाटेने शेलु बु. येथे गेल्या. त्यानंतर त्या आँटोमध्ये बसून जवळच असलेल्या पुसद तालुक्यातील पन्हाळा फाट्यावर उतरल्यात. त्यानंतर तीघी पुसदकडे गेल्याची चर्चा आहे.या प्रकरणाचा संबंध एखाद्या मुली विक्री करणार्‍या रॅकेटशी संबंध असल्याचीही सोंडा व परिसरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजपूत, सहाय्यक पोउपनि शिवाजी मस्के करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close