क्राइम

दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले 

Spread the love
जागेच्या वादावरून दोन कुटुंबात राडा , बालाजी नगर येथील घटना 
 

अमरावती  / प्रतिनिधी 

             जागेच्या वादावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत आई आणि मुलाच्या डोक्यावर सबलीने प्रहार केल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी झाली आहेत. घटना शहरातील बालाजी नगर येथील आहे. घटनेची माहिती मिळताच सी पी रेड्डी यांनी चमुसह घटनास्थळी भेट दिली. कुंदा देशमुख (65 वर्षे)  आणि मुलगा सुरज देशमुख (25 वर्षे) अशी मृतकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगलधाम परिसरातील बालाजीनगरमध्ये देशमुख कुटुंब गेली अनेक वर्षे राहत होते. विजय देशमुख, कुंदा देशमुख, मोठा मुलगा अंकुश आणि लहान मुलगा सुरज असे चार सदस्य राहत होते. लहान मुलगा  अंकुश एमआयडीसीमध्ये तर मोठा मुलगा सुरज अमरावतीच्या एका कंपनीत नोकरीला होते. सोमवारी एमआयडीसीला सुट्टी असल्याने संपूर्ण परिवार घरी होता. देशमुख कुटुंबाच्या घरामोर काही महिन्यापूर्वी लोणारे कुटुंबाने घर खरेदी केले होता.
सोमवारी दुपारी रिकाम्या जागेवरुन देशमुख परिवाराला शिवीगळ करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून कुंदा देशमुख बाहेर आल्या. बाहेर आलेल्या कुंदा देशुमखांना पाहून देवानंद लोणारचा राग अनावर झाला आणि त्याने बेसावध  कुंदा देशमुखांच्या डोक्यात पहारीने वार केला. आईच्य किंचळण्याचा आवाज ऐकून सुरज बाहेर आला तर त्याच्या डोक्यात देखील वार करण्यात आला. मुलगा आणि पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून विजय देशमुख वाचवण्यासाठी आले तर त्यांच्यावर देखील वार केला. गोंधळानंतर आजबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती. बघ्यांची गर्दी पाहताच लोणार आक्रमक झाला आणि त्याने पुन्हा मुलावर आणि आईवर वार केले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close