हटके

डोंगरावर झोका घेत असताना दोन महिला पडल्या खाली 

Spread the love

          अनेक वेळा आनंदासाठी करण्यात आलेली गोष्ट महागात पडल्याच्या अनेक घटना घडतात. असे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक लोक ते बघतात आणि त्यावर कॉमेंट्स देखील करतात. पण अश्या घटना आपल्या सोबत Kइंवा कुटुंबासोबत घडू नये म्हणून काळजी घेत नाहीत. या व्हिडिओत देखील आनंदासाठी झोका झुलत असलेल्या दोन महिलांसोबत भयानक घटना घडली आहे.

व्हिडीओमध्ये स्विंग पडल्यानंतरचे दृश्य दाखवण्यात आले नसले तरी स्विंगखाली काही सुरक्षा घटक जसे की गाद्या किंवा इतर सुरक्षा उपाय बसवले गेले असावेत अशी अपेक्षा आहे. अशा धोकादायक खेळांमध्ये सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुलींच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. या घटनेचा व्हिडिओ @shockingeek नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘डोंगराच्या शिखरावर झोक्यावरून दोन महिला पडल्या’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शेवटी स्विंग ढकलणारा यशस्वी झाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते स्थिर असणे आवश्यक आहे”.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close