गोपाळ वस्ती मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे भोजनदान
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे गोपाळ वस्तीमध्ये गोर गरीब लोकांना त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन सर्वांना भोजनदान करण्यात आले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे , यादोराव गणवीर, गणेश गजभिये,जिल्हा महिला सचिव रेखा रामटेके ,तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी ,तालुका सचिव अमित नागदेवे, तालुका संघटक प्रशिक मोटघरे व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते
जिल्हा महिला अध्यक्ष यांनी सांगितले की दान देणे हे बौद्ध धम्मात अतिशय चांगले मानले जाते हे धममदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून गोपाळ वस्तीमध्ये छोट्या पासून तर मोठ्या बालकांपर्यंत भोजनदान केला मोठ्या उत्साहाने गोपाळ वस्तीतील सर्व लोकांनी लहान बालकांनी ,महिलांनी या भोजन दानाचा चांगला प्रकारच्या आस्वाद घेतला कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी यांनी केले आणि आभार तालुका सचिव अमित नागदेवे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रेखा रामटेक, यादोराव गणवीर, गणेश गजभिये, जगदीश रंगारी, व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले