श्वानाप्रती मानवी प्रेम कायम,नागरिकांकडुन श्वानावर अतिंमसंस्कार
वरूड/तूषार अकर्ते
प्राण्याचा जिव्हाळा माणसासाठी कधीच लपुन राहिला नाही आणि ते ही खास करून श्वानाबद्दलचे प्रेम ब-याच ठिकाणी दिसुन आले आहे.पंरतु तो कुठल्यातरी घरचा सदस्य म्हणुनच परंतु भुरा नावाच्या श्वानाने तर सर्व परिसरातील लोकांना वेळ लावलेले पहायला मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शेंदुरजनाघाट येथील प्रभाग क्रमांक पाच मधील सावता चौक परिसरातील लाडका श्वान भुरा दहा वर्षा आधी मारोतराव देवते यांच्या शेतातुन त्यांच्या मागे मागे चालत शहरात आला व त्यांने काही दिवसातच परिसरातील नागरिकांची मने जिंकली. त्याचा बद्दल प्रत्येकांच्या मनात प्रेम व आपुलकी निर्माण झाली. ही आपुलकी व प्रेम एवढे वाढले की काम करून घरी आलेला माणुस सुद्धा त्याच्या सोबत काही क्षण देत असे.या परिसरातील बालगोपाल त्याचा सोबत खेळत, बागळत असे महिला सुद्धा आपल्याच परिवारातील सदस्य म्हणुन सकाळी व रात्री त्याला भाकरी मिळाली की नाही याची खात्री करून घेत असत व त्याला जेवायला देत असे. सर्वांचा लाडका श्वान भुरा ची मागील आठवड्यात अचानक तब्येत खराब झाली आणि त्यांनी आपले अन्नपाणी सोडले अशा सर्व परिस्थितीत परिसरातील नागरिकांनी त्याला साथ देत त्याचा तब्येतीबाबत एकमेकांमध्ये विचारपुस सुरू केली.व त्याचा आजार लवकरच बरा व्हावा या करिता डॉक्टरांना सुद्धा पाचारण करण्यात आले व डॉक्टरांच्या सल्लेने त्याला औषधोपचार करून त्याचा तब्येतीत सुधार आणला. तब्येत बरी होत असल्याचे जाणवल्याने सर्वत्र आंनद पसरला परंतु लाडका भुरा वयोवृद्ध झाल्यामुळे त्याची तब्येत पुन्हा खालावली व दि.८ जुलै पहाटे त्याने अंतिमश्वास घेतला.पहाटे पासूनच त्याला पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी करत त्याच्या अतिंमसंस्काराची तयारी पुर्ण केली व त्याला सकाळी ९ वाजता च्या दरम्यान देवना नदीकाठी मुठ माती दिली.अशा प्रकारे परत एकदा प्राण्याप्रती असणारे प्रेम एकदा पुन्हा दिसुन आले आहे.