डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन केले ठार

बेंगळुरू / विशेष प्रतिनिधी
डॉक्टर पतीने आपल्या डॉक्टर पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन ठार केले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणी नंतर आणि फॉरेन्सिक रिपोर्ट वरून सहा महिन्यांनंतर या हत्येचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी डॉक्टर पतीला बेड्या ठोकल्या आहेत. डॉक्टर ला हॉस्पिटल उघडायचे होते आणि. त्यासाठी त्याला 60 लाख रुपये हवे होते. असा आरोप डॉक्टर च्या सासरच्या मंडळीने केला आहे.
डॉ.महेंद्र रेड्डी असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी डॉक्टरने पत्नी डॉ.कृतिका रेड्डीला बेशुद्धीचं एनेस्थिसीया ड्रग्जचं इंजेक्शन मारलं आणि हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दिखावा केला. सहा महिन्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर डॉ.महेंद्रला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
बंगळुरुत राहायचं डॉक्टर दाम्पत्य
31 वर्षीय डॉ. महेंद्र रेड्डीने त्याच्या 28 वर्षीय MBBS एमडी पत्नी कृतिकासोबत बंगळुरुतील मुन्नेकोलाला परिसरात राहत होता. 21 एप्रिल 2025 ला कृतिका अचानक आजारी झाली होती. पती डॉक्टर रेड्डीने तिला रुग्णालयात नेलं होतं. पण कृतिकाला मृत घोषित करण्यात आलं होतं.रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मराठाहल्ली पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
पोलिसांना मिळाले खळबळजनक पुरावे
पोलिसांनी तपास सुरु केला. सीन ऑफ क्राईम (SOCO) टीमने घटनास्थळी तपास केल्यानंतर धक्कादायक पुरावे समोर आले. घटनास्थळावरून कॅनुला सेट,इंजेक्शन ट्यूब आणि अन्य मेडिकल उपकरण जप्त करण्यात आले. त्यांना तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं. तसच कृतिकाच्या सॅम्पललाही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं. जेणेकरून मृत्यूचं कारण उघड होईल.
त्या रिपोर्टमुळे सत्य आलं समोर
एफएसएल रिपोर्ट समोर आल्यानंतर संपूर्ण घटनेमागचं सत्य समोर आलं. डॉ.कृतिकाचं विसरा रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला की, तिच्या शरीरात प्रोपोफोल नावाचं शक्तिशाली एनेस्थेटिक ड्रग्ज होतं. हे सामान्य उपचारासाठी देण्यात येत नाही. त्यामुळे आरोपी डॉक्टरवर संशयाची सुई फिरकली. रिपोर्टच्या माध्यमातून डॉ. कृतिकाचा पती डॉ. महेंद्र रेड्डी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
सासरच्या पैशातून उभं करायचं होतं रुग्णालय
60 वर्षीय मुनी रेड्डीने पोलिसांत तक्रार दाखल करत म्हटलं की, त्यांनी त्यांची छोटी मुलगी कृतिकाचं लग्न 26 मे 2024 रोजी डॉ. महेंद्र रेड्डी यांच्यासोबत लावलं. कृतिका एमबीबीएस,एमडी डॉक्टर होती. लग्नानंतर पती-पत्नी बंगळुरुच्या गुंजूर येथे राहत होते. त्यांचा आरोप आहे की, लग्नानंतर डॉ. महेंद्र रेड्डी पत्नीकडून अपेक्षा ठेवत होता. त्याला एक रुग्णालय सुरु करायचं होतं.त्यामुळे तो सासरच्या लोकांकडे पैशांची मागणी करायचा.