राष्ट्रीय

डॉक्टर चा दहशतवादी संघटनेशी सबंध, पोलिसांनी केली अटक

Spread the love

पोलिसांनी ३०० किलो आरडीएक्स आणि दोन एके ४७ रायफल सह दारूगोळा केला जप्त

श्रीनगर /विशेष प्रतिनिधी 

                जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या एका कारवाई नंतर राज्यातच नव्हे तर देशात खळबळ माजली आहे. शासकीय सेवेत असलेल्या एका डॉक्टर ला प्रतिबंधित जैश ए मोहम्मद संघटनेशी सबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. डॉक्टर ने सांगितलेल्या ठिकाणाहून ३०० किलो आरडीएक्स,दोन एके ४७ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे.

डॉ. आदिल अहमद राथर असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव असून, तो अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषध विशेषज्ञ होता. डॉ. राथर यांने बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे प्रचाराचे पोस्टर लावल्याप्रकरणी सहारनपूर येथून श्रीनगर पोलिसांनी अटक केली होती.

शस्त्र साठा कोणी लपवला होता?

सध्या डॉ. आदिल जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आदिल राथरची चौकशी केली असता अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघड झाल्या आहेत. दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन डॉक्टर होते. त्यातील दोघांना अटक करण्यात आली, मात्र तिसरा डॉक्टर अजूनही फरार आहे.

तपासादरम्यान, डॉ. राथरने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी हरियाणातील फरीदाबाद येथे छापा टाकला. या छाप्यात ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. डॉ. राथर हा अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील रहिवासी आहे.

कॉलेज लॉकरमधूनही शस्त्रे जप्त

यापूर्वी, जॉइंट इंटरोगेशन सेंटर अनंतनागच्या गुप्तचर माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी जीएमसी अनंतनाग येथील डॉ. राथर यांच्या वैयक्तिक लॉकरची तपासणी केली होती. त्यावेळी, लॉकरमधून आणखी एक एके-४७ असॉल्ट रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता.

तपास यंत्रणांकडून कसून चौकशी

पोलिस आता ही शस्त्रे आणि प्रचंड स्फोटकांचा साठा कोठून आला, डॉक्टर ते कशासाठी बाळगत होते आणि त्यांचे अन्य दहशतवादी कारवायांशी काही संबंध आहेत का, या दिशेने कसून तपास करत आहेत. दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका उच्चशिक्षित डॉक्टरचा सहभाग उघड झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close