डॉक्टर पित्याकडून पोटच्या मुलीची सर्जिकल ब्लेड ने गळा चिरून हत्या
हिस्सार (हरियाणा ) / नवप्रहार मीडिया
एका पशुवैद्यकीय डॉक्टर ने आपल्या 8 वर्षीय एकुलत्या यरक मुलीची सर्जिकल ब्लेड ने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यात घडली आहे. त्यानंतर पित्याने देखील आपल्या हाताची नस कापून घेत आणि पोटावर वार करत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. डॉक्टर मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजत आहे.
हिस्सारमधल्या लाला लजपतराय पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठाच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये प्रोफेसर संदीप गोयल कार्यरत होते. एएसपी राजेश मोहन यांनी सांगितलं, की त्यांच्या नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत असं कळलं आहे, की ते मानसिकदृष्ट्या आजारी होते. त्यांना डिप्रेशनचा त्रास होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते उपचार योग्य होत नसल्यामुळे त्यांनी अनेक डॉक्टर्स बदलले होते. आता या प्रकरणी अधिक माहिती गोळा केली जात आहे.
प्रोफेसर संदीप यांनी रविवारी (10 मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्याच ऑफिसमध्ये सर्जिकल ब्लेड आणि चाकूच्या साह्याने आपल्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या पोटावर आणि हातांवर चाकूने वार करून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच. एसपी मोहित हांडा, एएसपी डॉ. राजेश मोहन, डीएसपी विजयपाल आणि फॉरेन्सिक लॅबच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी, तपासणी केली. दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले
जिंदमधलं नरवाना हे डॉ. संदीप गोयल यांचं मूळ गाव. ते आपली पत्नी नीतू गोयल आणि एकुलती एक आठ वर्षीय मुलगी सायना हिच्यासह संस्थेच्या ओल्ड कॅम्पसमध्ये असलेल्या सरकारी क्वार्टर्समध्ये राहत होते. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास ते दुकानात जायच्या बहाण्याने मुलीला घेऊन घराबाहेर पडले. तासभर झाला तरी ते परतले नाहीत. त्यामुळे त्यांची पत्नी आणि आई दोघींनी त्यांना फोन केला. तो उचलला न गेल्याने त्या दोघी या दोघांना शोधत त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या.
ऑफिसचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तो दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्यांना बाप-लेक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळलं. मुलीचा गळा कापलेला होता आणि पोटातून आतडी बाहेर पडलेली होती. डॉ. संदीप यांच्या पोटाच्या आणि हाताच्या शिरा कापल्या गेल्या होत्या. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता.