हटके

शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टरांचा मृत्यू 

Spread the love
जांजगीर (छत्तीसगड) / नवप्रहार वृत्तसेवा
             मृत्यूने कोणालाही ऐकले नाही.तो केव्हा आणि कसा येईल याचा देखील नेम नसतो. गर्भवती महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना जांजगिर – चंपा रुग्णालयात घडली आहे.

 मिळालेल्या माहिती नुसार डॉक्टर शोभाराम बंजारे हे जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भवती महिलेवर उपचार करत होते. त्याचवेळी डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालय व्यवस्थापनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना आणि डॉक्टरच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉ.शोभाराम बंजारे हे सेवानिवृत्तीनंतर गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा रूग्णालय जंजगीर येथे कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते.

रात्री 8 वाजता ते ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भवती महिलेवर उपचार करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close