डॉ. पंजाबराव देशमुख यांची 125 जयंती शासकीय निवासी शाळा हिंगणगाव येथे साजरी
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती शासकीय निवासी शाळा हिंगणगाव येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बार्टी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे )अंतर्गत समतादूत सरोज आवारे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ए.डी.बोरे व उपस्थित गुरुजन वर्ग व विद्यार्थी सर्वात प्रथम डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या सरोज आवारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले डॉ.पंजाबराव देशमुख यांची 125 जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समतादूत सरोज आवारे या म्हणाल्या डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती फोटो पूजन पुरती सीमित न ठेवता त्यांच्या विचारांचा वारसा व त्यांनी शेतकऱ्यांसाठी व समाजासाठी जे कार्य केले आहे त्या विचारांचा वारसा आपण जोपासणे फार गरजेचे आहे विद्यार्थी म्हणून जगत असताना कुठल्याही समाजसुधारकांची पुण्यतिथी आणि जयंती ही भाषणापूर्ती सीमित न राहता त्या व्यक्तीने केलेल्या कार्यांची आणि विचारांचे मूल्य विद्यार्थ्यांनी जपणे व आपल्या आयुष्यात त्या मूल्यांना लागू करणे महत्त्वाचे आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण जयंती साजरी करतो याचे समाधान आपल्याला होईल शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी हे कायम लक्षात ठेवावे की आपण ज्या समाजात राहतो आहे त्या समाजाच्या विकासासाठी आपलं काहीतरी देणं लागतं हे विचार मनात रुजवणे गरजेचे आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती आपण साजरी करतो आहे असे आपल्याला वाटेल कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ए .डी.बोरे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना म्हणाले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना शिक्षणाविषयी व शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ हे त्यांच्या कार्यातून दिसते सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार मिळावा यासाठी त्यांनी कार्य केले आणि आपल्याला मिळालेल्या सुविधाचा योग्य वापर करून स्वतःला घडवणे व त्यांचा विचारांवर पाऊल टाकने गरजेचे आहे. कार्यक्रमाचे संचालन राहुल सावलीकर तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्चना चौधरी यांनी केली कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या समतादूत सरोज आवारे, मुख्याध्यापक ए.डी .बोरे व गुरुजन वर्ग , विद्यार्थी लाभले