क्राइम

वॉशरूम मध्ये सीसीटिव्ही कॅमेरा लावून रुग्णांचे चित्रीकरण करणाऱ्या डॉक्टर ला अटक 

Spread the love

लक्ष्मणगढ (राजस्थान ) / नवप्रहार डेस्क

                डॉक्टर ला जमिनीवरील देव म्हटल्या जाते. कारण या व्यक्तीमुळे  अनेकांना दुखण्यातून मुक्ती आणि वेळप्रसंगी जीवनदान मिळत असते. पण आता डॉक्टर वर भरोसा करण्यासारखा जमाना राहिला नसल्याचे बघायला मिळत आहे. डॉक्टरांकडून नर्स किंवा महिला रुग्नांसोबत छेडखानी अथवा लैंगिक अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही डॉक्टर तर त्यांच्या कडे आलेल्या रुग्णांचे अश्लील व्हिडिओ बनवत असल्याचे देखील समोर आले आहे. राजस्थानच्या लक्ष्मणगढ येथील डॉक्टर ने तर वॉशरूम मध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

 एका डॉक्टरने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता, एका महिलेला संशय आल्यावर तिने त्याची बॅग चेक केल्यावर जे काही दिसलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

एका खासगी फिजिओथेरपी सेंटरच्या टॉयलेटमध्ये चोरून कॅमेरा लावले होते. या कॅमेराबाबत कोणालाचा माहिती नव्हती. या सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेला एका डॉक्टरवर संशय आला. तिने डॉक्टरच्या केबिनमध्ये ठेवलेली बॅग चेक केली. त्यामध्ये तिला एक पेन ड्राईव्ह सापडला. महिलने हा पेन ड्राईव्ह घरी आणून पाहिला, त्यामध्ये असलेले व्हिडीओ पाहून तिला धक्काच बसला. याबाबत तिने आपल्या घरच्यांना सर्व प्रकार सांगितलं. घरच्यांनी पोलिसात धाव घेतली आणि या प्रकरणाची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या तक्रारीनंतर थेट सेंटरवर छापा टाकला. टॉयलेटमधील कॅमेरा आणि चार ते पाच पेन ड्राईव्ह सापडले. या पेन ड्राईव्हमध्येही आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले. हा प्रकार राजस्थानच्या सीकर जिल्ह्यामधलील लक्ष्मणगड येथे घडला आहे. लक्ष्मणगडचे एसपी दिलीप मीना यांनी याबाबत माहिती देताना पेन ड्राईव्ह सापडले असून आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

सध्या सेंटरमधील कर्मचारी जबाब देण्यास नकार देत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, असंही दिलीप मीना म्हणाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close