हटके

रेल्वेला असलेल्या निळ्या आणि लाल डब्यातील फरक तुम्हाला माहिती आहे काय ? 

Spread the love

रेल्वेला असलेल्या निळ्या आणि लाल डब्यातील फरक तुम्हाला माहिती आहे काय ?

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी

                 दळणवळणाच्या साधनात रेल्वेचे एक विशेष महत्व आहे. रेल्वे मुळे औद्योगिक क्षेत्रात भरभराट झाली आहे. सोबतच जनतेला देखील फायदा झाला आहे. कारण एसटी च्या तुलनेत रेल्वेचे टिकिट ( साधारण ) कमी आहे. शिवाय बसून बसून जर तुम्हाला कंटाळा आला तर पाय मोकळे करण्यासाठी तुंही रेल्वेत फिरू देखील शकता. त्यामुळे Jया ठिकाणी रेल्वे आहे. तेथे नागरिक प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात.

                       रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला दोन प्रकारचे डबे दिसतील . काही डब्यांचा रंग लाल तर काहींचा निळा असतो. आता तुम्ही विचार कराल की काय लाल आणि काय निळा आपल्याला काय बसूनच जायचे आहे. पण लाल आणि निळ्या डब्यातील अंतर आपण समजून घेतल्यास त्या रंगा मागचा फरक तुमच्या ध्यानात येईल .

रेल्वेबाबत अनेक गोष्टी  प्रवाश्यांना माहीत नसतात. तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल, पण तुम्ही कधी रेल्वेच्या लाल आणि निळ्या डब्यांचं अर्थ काय? किंवा रेल्वेचे डबे लाल आणि निळ्या रंगाचे का असतात? याचा विचार केलाय का? नक्कीच केला नसेल. पण आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहोत.

दोन रंगांमधील फरक

भारतीय रेल्वेत ICF आणि LHB कोच असतात. निळ्या रंगाचे डबे ICF असतात आणि लाल रंगाचे LHB असतात. यात बराच फरक असतो. भारतात एक्सप्रेस रेल्वेंमध्ये निळ्या रंगाची बोगी दिसेल तर राजधानी आणि सुपरफास्ट प्रीमियम रेल्वेत लाल कोच दिसतील. लाल डबे निळ्यांच्या तुलनेत जास्त सेफ असतात. लाल डब्यांना अॅँटी-टेलीस्कोपिक डिझाइनने तयार केलं जातं. अशात ते एकमेकात भिडत नाहीत आणि सहजपणे रूळावरून घसरत नाहीत. इतकंच नाही तर टक्कर झाल्यावर बोगी एकमेकांवर चढत नाही. हे कोच 200 किलोमीटर प्रति तासांच्या स्पीडने धावणाऱ्या रेल्वेत असतात.

निळ्या डब्यांचं काय?

मीडिया रिपोर्टनुसार, निळ्या डब्यांचं निर्माण चेन्नईमध्ये केलं जातं. हे लोखंडापासून तयार केले जातात. तसेच यात एअर ब्रेकचा वापर केला जातो. या डब्यांचं मेंटेनन्स करण्यासाठी जास्त खर्च येतो. तसेच यात सीटही कमी असतात. या डब्यांचं लाइफ पंचवीस वर्षे असतं. त्यानंतर हे डबे सेवेतून काढले जातात. तर लाल डब्यांचा वापर 30 वर्ष केला जातो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close