शेत बांधावरील प्रयोगशाळा: शेतीतील खर्च कमी करण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढण्यासाठी उत्कृष्ठ पर्याय: आमदार बच्चू भाऊ कडू
एरंडा (वाशीम)/ नवप्रहार डेस्क
दिनांक ९/५/२०२४ ला आमदार बच्चू भाऊ कडू ह्यांनी फार्म लॅब एरंडा, वाशिम येथे सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमा दरम्यान फार्म लॅब एरंडा चे व्यवस्थापकीय संचालक डॉ संतोष चव्हाण ह्यांनी जयकिसान शेतकरी गट व फार्म लॅब एरंडा शेतकरी उत्पादक कंपनी बद्दल कार्याचा आढावा देण्यात आला.
एरंडा येथील शेतकरी बांधव २०१९ पासून स्वतःच शेती साठी लागणाऱ्या नैसर्गिक निविष्ठा बनवीत आहेत. शेतकरी बांधवांनी स्वतःच निविष्ठा निर्मिती केल्यामुळे त्यांचा शेतीला लागणाऱ्या खतांचा व औषधींचा खर्च ५० ते ७० टक्के कमी करण्यात यश मिळाले आहे. विशेषतः २०११ पर्यंत अत्यंत विषारी औषधींचा वापर करीत होते परंतु आज सर्व प्रकारच्या विषारी औषधींचा वापर बंद करण्यात आलेला आहे.
आजघडीला प्रत्येक क्षेत्रातील अति रसायनांच्या वापरामुळे पाण्याचे, मातीचे, हवेचे तसेच मानवी व इतर सजीव सृष्टीचे आरोग्य धोक्यात आलेले आहे ह्याचे वेगवेगळे दाखले जागतिक स्तरावर उपलब्ध आहेत.
वरील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने जीवन जगण्याची व शेती करण्याची गरज आहे असे प्रति पादन डॉ संतोष चव्हाण ह्यांनी केले आहे.
२०१६ मध्ये एरंडा वाशिम येथील शेतकरी बांधवांनी जय किसान शेतकरी गटाची स्थापना केली. २०१९ मध्ये फार्म लॅब म्हणजेच शेत बांधावरील प्रयोग शाळेची स्व-खर्चातून उभारणी केली. २०२३ मध्ये फार्म लॅब एरंडा ह्या नावाने शेतकरी उत्पादक कंपनीची सुरवात केली. गावातच त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेषतः त्यांच्या घरातील महिला व मुले ह्यांना सुध्धा रोजगार उपलब्ध झाला आहे.
२०२१ पासून जय किसन शेतकरी गट व फार्म लॅबचे संचालक डॉ संतोष चव्हाण, श्री दिपक घुगे, श्री विजय घुगे, श्री मनोहर सांगळे, श्री सतीश कुरकुटे, वैभव घुगे, विठ्ठल ईडोळे महाराष्ट्रतील शेतकरी बांधवांना नैसर्गिक निविष्ठा निर्मिती चे प्रशिक्षण देत आहेत.
श्री उद्धवराव जी बंड श्री मनोज भाऊ वानखडेश्री प्रफुल भाऊ नवघरे श्री पुष्पक श्रीरामजी खापरे श्री संजय भाऊ तट्टे विशाल भाऊ आवारे प्रताप भाऊ बंड सर्व सिट्रस इस्टेट चांदूरबाजार येथील टीम माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या च्यासोबत होती
२०२० ला जय किसान शेतकरी गटाने १ प्रयोगशाळा उभारलेली होती आज घडीला महाराष्ट्रात ७७ तसेच मध्यप्रदेश मध्ये १०, गुजरात मध्ये १, बिहार मध्ये १ शेत बांधावरील प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत.
कार्यक्र्मा दरम्यान श्री.शंकर तोटावार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी सोयाबीनच्या अष्टसूत्री विषयी शेतकर्याना मार्गदर्शन केले. सोयाबीनच्या अष्टसूत्री च्या नियोजन बद्ध कामा मुळे वाशीम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे उत्पादन व उत्पन्न कशे वाढले हि यशोगाथा मांडली तसेच शेत बांधावरील प्रयोगशाळा गावो गावी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
शेतकरी, शास्त्रज्ञ, प्रशासन व कृषी विभागाच्या एकत्रित कार्याचे आमदार बच्चू भाऊ कडू ह्यांनी खूप खूप कौतुक केले. शेतीतील निविष्ठा वरील खर्च कमी करण्यात यावा व शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढावे यावर आमदार बच्चू भाऊ कडू ह्यांनी भर दिला. शेतकरी बांधवांसाठी बांधावरील प्रयोगशाळेचे “एरंडा मॉडेल” भविष्यात एक दिशा दर्शक ठरेल व अशेच मॉडेल महाराष्ट्रात तसेच देशभरात व्हावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित जय किसान शेतकरी गटाचे सदस्य तसेच एरंडा ग्राम पंचायत सरपंच उप सरपंच व पोलीस पाटील व गावकरी मंडळी व शेतकरी बांधव उपस्थित होते.