क्राइम

फोनवर बोलल्याच्या कारणावरून दिंव्यांग युवकाला गमवावा लागला जीव 

Spread the love

जळगाव / नवप्रहार मीडिया 

                         सध्या जीव ही सगळ्यात स्वस्त वस्तू बनली आहे.थोडे जरी भांडण झाले तरी त्यातील एकाचा जीव गेलाच समजा. माझ्या बहिणीला फोन का केला ? अशी विचारणा करत गावातील दोन भावंडांनी त्या युवकाला बेदम मारहाण केली त्यात त्याला जीव गमवावा लागला.

               घटना जळगाव जामोद तालुक्यातील चावरा इलोरा या गावातील आहे. आकाश सोळंके या  दिंव्यांग युवकाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घडली आहे.या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर मृतक तरुण आकाश सोळंकेचे वडील गोकुळ सोळंके यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी चावरा येथील आरोपी अर्जुन सोनोने आणि राजेश सोनोने यांच्या विरोधात कलम 302, 34 भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपीस अटक करण्यात आली आहे.

आकाश आरोपीच्या बहिणीसोबत फोनवर बोलायचा. हे आरोपीला आवडत नव्हतं. त्यामुळे त्याने आकाशच्या घरात घुसून त्याला बहिणीशी फोनवर का बोलतो? असं विचारत बेदम मारहाण केली.

घटना घडली त्यावेळी  आकाशचे आई वडील शेतात गेले होते. संध्याकाळी घरी परत आले असता त्यांना आकाश जखमी अवस्थेत पडलेला दिसला. आई-वडिलांनी आकाशला विचारणा केली. यावेळी त्याने गावातील अर्जुन सोनोने आणि राजेश सोनोने या दोघांनी बेदम मारहाण केल्याचं सांगितलं. आकाशला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, या मारहाणीत झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close