प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाचे उपक्रम स्वातंत्र्य दिनानिमित्त मॅरेथॉन – 2023,रन फाॅर – आय लव्ह इंडिया चे आयोजन
घाटंजीत स्वातंत्र्य दिनानिमीत्त पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धा जनतेचा भरभरुन प्रतिसाद
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
ज्या स्वातंत्र्यवीरांनी सर्वस्वाचा त्याग करुन बलिदानातून भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र केलं त्या स्वातंत्र्यवीराविषयी श्रद्धा,आदर व प्रेमभाव जागृत राहावा. देशाप्रती सर्वांमध्ये प्रेमभाव तसेच सर्व जाती/धर्मा मध्ये भाईचारा असावा,दु:खी मानवतेविषयी प्रेम व नैतिकवान,चारित्र्यसंपन्न नेतृत्व निर्माण व्हावेत,गरीबीमुक्त,नशामुक्त, भ्रष्टाचार मुक्त,बेरोजगारी मुक्त भारत असावा.भारताचा जगात आदर्श निर्माण करणारी पिढीसमोर निर्माण व्हावी या उद्देशातून मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक मधुकर निस्ताने यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींचे हस्ते जयस्तंभाचे पूजन व मॅरेथॉन स्पर्धकांना तिरंगा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मा.विजय साळवे तहसीलदार, मा.अमोल माळकर मुख्याधिकारी मा. नीलेश सुरडकर पोलीस निरीक्षक,मधुकर निस्ताने(पीबीआय) यांच्या सहीचे स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
स्पर्धेत परिक्षण श्री. प्रदीप वाकपैंजन,प्रफुल राउत,चांदेकर सर यांनी पारदर्शकपणे केले. लगान मुले- मुली,तरुण व वयस्कर असे चार गटातून तीन-तीन क्रमांक देण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेचे प्रथम मानकरी व लगान मुलांमध्ये दर्शन
शिंगेवार हा ठरला,मुलींमध्ये कु. पलक भोयर,तरुण गट -राजू बघेल, वयस्कर -उद्धव टेकाम हेड कॉन्स्टेबल ठरले. कु. उद्धेश्वरी ताकसांडे,कृतीका सोनूर्ले प्ननय गोल्लीवार,साईराम सोंठपेल्लीवार,अंकुश पवार, अनूज रामेलवार,स्वप्निल आडे, संतोष जाधव, जेष्ठ नागरिक- अशोक निमकरसाहेब,श्रीराम पेटेवार, बि.टी.वाढवे यांनी दुसरा-तिसरा क्रमांक पटकावला. तसेच प्रोत्साहन पर बक्षीसे देण्यात आले.स्पर्धक व सर्व नागरिकाकरीता अन्नदाना चा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमास मा.आमदार डाॅ. संदीप धुर्वे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. प्रमुख उपस्थिती मा. सुरेश डहाके,विवेक डेहनकर, अरुण कपीले,उस्मानभाई, होमदेव किनाके,भगवान डोहळे, मोरेश्वर वातीले, अनंत कटकोजवार,सुनील देठे, चंद्रशेखर नमुलवार,मनोज राठोड,प्रमोद ठाकरे ,निकम काका,यांच्यासह आयोजक- मधुकर निस्ताने,अनिल ढोणे, नरेंन्द धनरे,मोहन पवार,पांडुरंग किरणापूरे,भूषण शास्त्रकार, किशोर ठाकरे,राजू अग्रहारी, उमेश पवनकर,बबलू परचाके, राम भांदककर, यांनी परीश्रम घेतले.