महादीप परीक्षेमध्ये जि.प.शाळा तिवसाळा अव्वल

५ विद्यार्थी विमानवारी करणार गावत मिरवणूक काढत केला उतिर्ण विद्यार्थी चा स्वागत सत्कार
घाटंजी ता. प्रतिनिधि-
घाटंजी : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा तिवसाळा येथील सहा विद्यार्थी महादिप परिक्षेत बसविले होते यापैकी तब्बल पाच विद्यार्थी विमानवारी करिता पात्र ठरले आहे.
नुकत्याच झालेल्या महादीप परीक्षेच्या जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धेत जि प उच्च प्राथमिक शाळा तिवसाळा केंद्र पांढुर्णा (बु) पं.स. घाटंजी येथील सहा पैकी पाच विद्यार्थी विमानवारीसाठी पात्र ठरले. सदर परीक्षा ही सर्वप्रथम शाळास्तर, केंद्रस्तर, तालुकास्तरीय दोन फेरी आणि जिल्हास्तरावर अंतिम फेरी घेण्यात आलेली होती. या परीक्षेसाठी जवळपास 18 हजार विद्यार्थ्यांपैकी 614 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय फेरी साठी पात्र होऊन परीक्षा दिली होती. तिवसाळा येथील कु. ज्ञानेश्वरी ओमप्रकाश खंडाळकर, कु.संध्या प्रवीण राठोड, कु. पलक मिलिंद सेलूकार,श्रवण महादेव आडकिने सोहम ओमप्रकाश खंडाळकर हे पाचही विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत येऊन विमानवारीसाठी पात्र ठरले. सदर परीक्षेसाठी शाळेतील विषय शिक्षक अमोल डंभारे आणि सहाय्यक शिक्षिका कु. अश्विनी बोरकर यांनी अथक परिश्रम घेऊन या विद्यार्थ्यांना जिल्हा गुणवत्ता य₹यादीत आणले.तसेच शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक गजानन इडपाते सर, काशिनाथ आडे, मनोज उत्तरवार, रामेश्वर भंडारवार, दिनेश सहारे कु. मीनाक्षी बन्सोड यांचे खूप सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील मुलांच्या यशाबद्दल पंचायत समिती घाटंजीचे गटविकास अधिकारी महेश ढोले साहेब, गटशिक्षणाधिकारी. सुधाकर वांढरे साहेब, विस्तार अधिकारी सुनील बोंडे सर व विशाल साबापूरे सर तथा सर्वसाधनव्यक्ती यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती तिवसाळा आणि समस्त गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करून विद्यार्थी आणि समस्त शिक्षक वृंद तिवसाळा यांचे अभिनंदन केले.
******
तिवसाळा जिल्हा परिषद शाळेतील विषय शिक्षक अमोल डंभारे यांनी शाळेच्या व्यतिरिक्त वेळी तसेच सुट्टीच्या दिवशी सुध्दा विद्यार्थ्यांना वर्षभर शिक्षण दिले
महादीप परीक्षेमध्ये आपल्या पाचही विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत येण्यासाठी सतत धडपड आणि अथक मेहनत करणारे जिल्हा परिषद शाळा तिवसाळा येथील विषय शिक्षक श्री अमोल डंभारे सर यांच्याकडून पाचही विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या बक्षीस मधून आपल्या आवडत्या वस्तूंची खरेदी केली आणि आपल्या शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले. सरांनी दिलेल्या बक्षिसाबद्दल सर्वत्र डंभारे सरांचे कौतुक करीत आहे.