आमदार संजय कुटे यांनी अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय अधिवेशन स्थळाची पाहणी
अंजनगाव सर्जी, मनोहर मुरकुटे
अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून, गेली एक वर्षापासून सुरू असलेल्या अधिवेशनाचे काम हे पूर्णत्वास आले आहे
सदरच्या होऊ घातलेल्या अधिवेशन स्थळाची पाहणी नुकतीच माजी मंत्री आमदार संजय जी कुठे ,रमेश जी घोलप व व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत अधिवेशन स्थळाची पाहणी केली असून त्या जागेवर असणाऱ्या काही त्रुटी या पूर्ण करण्याचे आदेश आमदार संजय जी कुठे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत
सदरच्या होऊ घातलेल्या अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,अजित दादा पवार आमदार प्रवीणजी दटके,आमदार संजयजी कुठे,विरोधी पक्षनेते विजय वडेडीवार ,माजी खासदार प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री बच्चुभाऊ कडू आमदार श्वेता महाले ,खासदार प्रतापराव जाधव, आमदार प्रकाश भारसाकडे आमदार आकाश पुंडकर व इतरही सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी हे अधिवेशन कार्यक्रमाला उपस्थित राहतील
,सदरचे अधिवेशनामध्ये समस्त बारी समाजाच्या
गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या ह्या पूर्ण व्हाव्या व बारी समाजाला एक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात स्थान मिळावे ,श्री संत रुपलाल महाराज यांच्या कर्मभूमी मध्ये त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे व सतत शेतीत कष्ट करणाऱ्या कष्टाळू बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावे जेणेकरून समाजातील सुशिक्षित होतकरू मुलांना आपला व्यवसाय हा स्वतःच्या पायावर उभे राहून करता यावा या उद्देशाने आर्थिक विकास महामंडळाच्या रूपाने या समाजाचा आर्थिक विकास होण्यास हातभार लागेल तसेच विदर्भातील अमरावती,अकोला, बुलढाणा ह्या तीन प्रमुख जिल्ह्यामध्ये पान पिंपरी ह्या वन औषधी पिकाची फार मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्या पिकाच्या भरोशावर ह्या समाजाचा पूर्णपणे उदरनिर्वाह चालतो परंतु गेली आठ दहा वर्षापासून ह्या वनौषधी पिकावर सततचा निसर्गाचे संकट येत असल्यामुळे हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे परिणामी कष्टाळू असलेला हा समाज सध्या स्थितीत आर्थिक डबघाईस आलेला आहे त्या उद्देशाने ह्या पिकाला पूर्वी सन 2011 पर्यंत सुरू असलेले रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळत असलेले अनुदान सुरू करावे जेणेकरून समाज हा आर्थिक प्रगतीवर येण्यास कारणीभूत ठरेल व इतरही काही प्रमुख समाजाभिमुख असलेल्या मागण्या ह्या शासनाच्या प्रतिनिधी कडून पूर्ण करून घेण्याच्या उद्देशाने एक आक्टोबर 2023 ला अधिवेशन अखिल भारतीय बारी महासंघाचे अधिवेशन शेगाव नगरीत आयोजित केले आहे सदरच्या अधिवेशनाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ,उपस्थित मान्यवरांच्या हातून शासन दरबारी आपली नोंद करून घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेश जी घोलप, रमेश जी डबे, देवीदासजी येऊल,अनिलजी हिस्सल, डॉक्टर कोथळकर, रतनजी फुसे ,दिनेश भोंडे, सुभाष रौंदळे, रमेश ताडे कैलास डोबे ,रुपेश येऊल ,उमेश भोंडे, अर्जुन घोलप, निलेश ढगे , ,मनोहर मुरकुटे , ऋषभ सातपुते ,मंगलाताई बारी, भरत बारी, सुभाष हागे, नागपुरे ,सुनील नागपुरे, पांडुरंग हागे ,भगवान रौंदळे ,संजय ढगे,अरुण माकोडे, मिसाळ, बळीराम धुळे, डॉक्टर श्याम नेमाडे, , उत्तमराव माकोडे ,वासुदेव भास्कर, संदीप दामदर ,अनंत दामदर,बळीरामजी धुळे प्रवीण पवार ,राजेश्वर पोकळे, बाळकृष्ण नाठे भरत बारी ,पांडुरंग ढगे, भूषण बारी ,वंदना बारी नितीन बारी ,संजय ढगे, , मंगेश पाटील व सर्व समाज बांधव,यांनी केले आहे