क्राइम

भाजपाच्या नेत्याच्या हत्येमागे बिश्नोई  टोळीचा हात ?

Spread the love

नवी दिल्ली  / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                    राजधानीतील भाजपा नेत्याच्या झालेल्या हत्येमागे बिश्नोई गॅंग चा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. बिंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजपचे स्थानिक नेते सुरेंद्र मतियाला यांची शुक्रवारी रात्री गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी अनेक गोष्टी समोर येत आहेत. Instagram वर या आशयाचा एक संदेश व्हायरल  होत असून यामध्ये भाजपा नेत्याची हत्या लॉरेन्स बिश्नोई यानेच केल्याचा दावा करण्यात येत आहे. ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याचे देखील बोलल्या जात आहे.

तपासादरम्यान, तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्यांचीही माहिती पोलिसांना मिळाली असून, त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणी कोणाच्या अटकेची पुष्टी अद्याप झालेली नाही. हत्येला काही तास उलटून गेले तरी पोलिसांनी अद्याप कोणाच्याही अटकेला दुजोरा दिलेला नाही. भाजप नेत्याच्या हत्येची ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. घटनेनंतर दुचाकीस्वार चोरटे पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

दुचाकी क्रमांक आणि कपड्यांवरून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पोलिसांच्या अर्धा डझन पथकांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपासले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून गोळा केलेले पुरावे फॉरेन्सिक टीम तपासत आहे. मृताचा मोबाईल तपासण्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स आणि स्थानिक गुप्तचरांचीही मदत घेण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात हे प्रकरण मालमत्तेच्या वादातून असल्याचे सांगण्यात येत आहे.

 दुसरीकडे दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात सुरेंद्र मतियाला यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तो त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसही घरच्यांशी बोलून मालमत्तेच्या वादाचा तपास करत आहेत. उल्लेखनीय आहे की सुरेंद्र मतियाला हे भाजपच्या नजफगढ जिल्हा किसान मोर्चाचे प्रभारी होते आणि त्यांनी यापूर्वी नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती. त्यांचे कार्यालय मटियाला रोडवर होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close