जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा ‘कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न’
भंडारा / जिल्हा प्रतिनिधी
माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे दिनदर्शिका २०२३ नुसार तसेच माननीय श्री. राजेश गो. अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा आणि समर्थ महाविद्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० मे, २०२३ रोजी समर्थ महाविद्यालय सिनियर काॅलेज, लाखनी येथे कायदेविषयक मार्गदर्शनाचे शिबीराचे आयाेजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिंगाबर कापसे, प्रार्चाय, समर्थ महाविद्यालय, लाखणी, यांनी केले
या प्रसंगी श्री. बिजु बा. गवारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी राष्टर्ीय विधी सेवा प्राधिकरण ¼गरिबी निमुर्लन योजनाची अंमलबजावनी ½ २०१५ तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकणामार्फत महिलांना, मुलांना, अपंगांना, गरीबांना तसेच समाजातील सर्व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोफत विधी सेवा दिली जाते व नुकसान भरपाई योजना संबधीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री. बी. बी. गभणे, मुख्य विधी सेवा संरक्षण अधिवक्ता, भंडारा यांनी बांधकाम/ शेती मजुरांच्या समस्या, केद्र व राज्य सरकारच्या योजनांतर्गत भेटणारे लाभ, तसेच कायदेशिर हक्क व इत्तर समस्या या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक डॉ. संगीता हाडग, तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री. बंडू चौधरी, यांनी केले. सदर कार्याक्रमात समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थीत होते.