क्राइम

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वानकर यांचेवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल 

Spread the love

सोलापूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                   ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्यावर अट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तर संबंधित महिलेच्या अवैध दारू विक्रीला विरोध केल्याने आणि  पतीला अवैध बांधकाम करण्यापासून थांबवल्या मुळे तिने सूडबुद्धीने तक्रार केल्याचा वानकर यांचा आरोप आहे. या घटनेने सोलापूरच्या राजकारणात हलचल माजली आहे. 

दरम्यान, अवैध दारू व्यवसायाला विरोध केल्यामुळेच आपल्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा खोट्या गुन्ह्याला आपण कदापि जुमानणार नाही. लोकहिताची कामे करताना धमक्यांना आपण घाबरणार नाही. खोट्या ॲट्रोसिटीला आपण कायद्याने उत्तर देणार असल्याचे सोलापूर शिवसेना  जिल्हाप्रमुख वानकर यांनी सांगितले.


 प्रकरणी उषा मलिक हब्बू यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वानकर यांच्यासह सहा जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी महिला उषा हब्बू यांचे पती खेड पाटी टोलनाकाच्या जवळ पानाची टपरी चालवतात. त्या पान टपरीच्या मागे शिवसेनेच्या ठाकरे गटचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर यांचे रिकामे प्लॉट आहेत. वानकर यांनी फिर्यादीला ही तुझी टपरी बेकायदेशीर आहे, असे म्हणत तुच्छतेने बोलत होते. त्यामुळे वानकर यांच्या विरोधात न्यायालयात खासगी फिर्याद देण्यात आली होती.

दरम्यान, न्यायालयात देण्यात आलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून गणेश वानकर आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी शनिवारी (एक जुलै) फिर्यादी महिलेला घरात जाऊन सर्वांसमोर शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच, उषा हब्बू यांच्या सूनबाईचा हातही पिरगळ्यात आलेला आहे. ‘माझ्या खडी क्रशरच्या गाड्यात आहेत. त्या गाडीच्या खाली घालून ठार मारेन’ अशी धमकीही दिल्याचे फर्यादीत उषा हब्बू यांनी म्हटलेले आहे.

ज्या व्यक्तीने माझ्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे, ती व्यक्ती कोणत्या समाजाची आहे, हे आपल्याला माहितीसुद्धा नाही. संबंधित व्यक्ती रस्त्यावर अवैधरित्या बांधकाम करून विनापरवाना त्या जागेवर दारूचे दुकान थाटण्याचा प्रयत्न करत होती. याबाबतची लेखी तक्रार आपण सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि मंडलधिकारी (सर्कल) यांना दिलेली आहे. त्या तक्रारीचा राग मनात धरून यापूर्वीच संबंधिताने माझ्या दारूधंद्याला अडचण निर्माण केली तर मी तुमच्यावर ॲट्रोसिटी दाखल करणार आहे. घरातील महिलांना पुढे करून विनयभंग यासारख्या केसेस दाखल करणार आहे, अशी धमकी दिली होती, असेही वानकर यांनी सांगितले.

वानकर म्हणाले की, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असल्यामुळे तो माझा विभाग येतो. तेथील रहिवाशांचीसुद्धा तक्रार होती. अवैध दारूधंद्यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. याबाबत तेथील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीतूनच आपण संबंधिताला रस्त्यावर अनधिकृत बांधकाम व दारू व्यवसायाला विरोध दर्शवला होता. मात्र, त्या व्यक्तीने कोणाचेही न ऐकतर अवैधरित्या सरकारी रस्त्यावरच रात्रीतून बांधकामाला सुरुवात केली होता. त्याला आपण विरोध केला. मागेसुद्धा आपणास त्याने ॲट्रॉसिटीची धमकी दिली होती. परंतु अशा धमक्यांना आपण जुमानणार नाही
.

अश्या प्रकरणाची चौकशी होणे आणि कायद्यात सुधारणा होने महत्वाचे – शासकीय नोकरीत असलेल्या आरक्षित अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केल्यास किंवा त्यांचा भ्रष्टाचार उघड केल्यास हे अधिकारी संबंधीतांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे किंवा खंडणी मागीतल्याची अथवा जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल करतात. यापुढे तक्रार कर्त्याने तक्रार दाखल करू नये यासाठी हा उपदव्याप असतो. लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार असल्याचे बुद्धिजीवी वर्गाचे मत आहे.

पोलीस विभाग देखील काढतो वचपा – राजकीय पुढारी किंवा पत्रकार अन्यायाविरुद्ध किंवा भ्रष्टचारा विरोधात एखाद्याच्या बाजूने पोलीस विभागा विरोधात आवाज उठवतो. त्यामुळे झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर येतो.असे प्रकरण मॅनेज करतांना त्यांच्या खिशाला झळ पोहचते अथवा त्यांची बदली होते. त्यामुळे ते पुढारी आणि पत्रकारां वर दात खाऊन असतात. आणि खुन्नस काढण्यासाठी लगेच त्यांच्यावर खंडणी, अट्रोसिटी सारखा गुन्हा दाखल करतात.

सोलापूर-बार्शी टोल नाक्याजवळील भोगाव हद्दीत अवैध दारूधंद्याला विरोध केल्यामुळेच माझ्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, असे स्पष्टीकरण असे शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिले.अवैध दारुधंद्याला विरोध केल्यामुळेच ॲट्रोसिटी : गणेश वानकर

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close