सामाजिक
जिल्ह्यात फोफावतोय अवैध सवकारीचा फास ; अनेक गरीब कुटुंब सावकाराच्या विळख्यात
पीडित महिलेची जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार
यवतमाळ / अरविंद वानखडे
यवतमाळ जिल्हातील गरीब आणि गरजू लोक सावकारीच्या मगरमिठीत फसत असून त्याची प्रॉपर्टी अत्यंत कमी किमतीत सावकारांच्या घशात जात असल्याची शोकांतिका नेर येथील महिलेच्या तक्रारी वरून समोर आली आहे. गरजू लोकांची प्रॉपर्टी स्टॅम्प पेपर वर लिहून घ्यायची त्यांनी रक्कम परत केली तरी त्यांच्याकडे रक्कम।शिल्लक असल्याचे सांगून ती पच्चम करायची है गोरखधंदा सावकारांनी सुरू केला आहे.
गरीब आणि गरजू लोकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी लिहून घ्यायची कर्जदाराने पैसे परत केल्यानंतर देखील त्यांच्यावर कर्ज दाखवून त्यांची प्रॉपर्टी हडप करायची हा धंदा यवतमाळ जिल्ह्यात चांगलाच फोफावत आहे. शासन आणि प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सततची नापिकी आणि काहीअन्य कारणाने अडचणीत आलेल्या लोकांकडे सावकार हाच पर्याय उरतो. यावेळी सावकार गरजू लोकांची शेती, प्लॉट, इतर मौल्यवान वस्तू अल्प रक्कम देऊन खरेदी केल्या जातअसल्याची तक्रार स्मिता किरण काकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिली आहे.
त्यांनी पत्रकार परिषदेत आपली कैफियत मंडगांना सांगितले की त्यांना पैशाची गरज असताना त्यांनी नेर मधील एका सावकाराकडून पैसे घेतले होते. या पैशाच्या मोबदल्यात शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर खुल्या प्लॉटचे सौदे पत्र सदर सावकाराने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करून सावकारीचा पैसा स्वतः दिला आहे.हा करार नामा तयार करत असतानाच पैसे परत झाल्या नंतर गहाण ठेवलेला प्लॉट परत करनार असे तोंडी सांगण्यात आले पैसे परत देण्यास तयार असताना सुद्धा समोरची व्यक्ती प्लॉट देण्यास तयार नाही. त्यामुळे अतिशय कमी पैशात खुला प्लॉट सावकाराच्या घशात जात आहे. असे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या आधी साडेतीन ऐकर शेती देखील २०% टक्के व्याजदराने घेतली त्याच्यावरचे व्याज मोठ्या प्रमाणात आकारून ती शेती सुद्धा विक्री करण्यास भाग पाडले. आता हा प्लॉट ही घेण्याच्या मार्गावर संबंधित व्यक्ती लागला आहे. असेही पत्रकार परिषदेत सौ.स्मिता काकडे यांनी सांगितले.
सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असून याप्रकरणी शासन काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.