जिल्हा भाजपा कडून कार्ग्रेसच्या राहुल गांधीच्या संसदेतील मनोवृत्तीचा कृतीचा निषेध
अकोला / प्रतीनिधी
देशाच्या संसदीय इतिहासामध्ये प्रथम सभागृहामध्ये काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भाजपाचे खासदार ज्येष्ठ माजी मंत्री प्रताप सारंगी व मुकेश राजपूत यांना धक्काबुक्की करून प्रताप सिंह सारंगी यांना तीन टाके लागले असून मुकेश राजपूत यांना हॉस्पिटलमध्ये दोन्ही खासदारांना भरती करण्यात आले आहे.
या प्रकरणात माजी काँग्रेसचे प्रवक्ते काँग्रेसचे माजी मंत्री आणि खासदार मनीष तिवारी यांनी राहुल गांधी यांनी धक्काबुक्की काँग्रेसच्या खासदाराला केली आणि त्यामुळे त्या धक्क्यामध्ये हे पडले ही कबुली दिली यावरून त्यांची मनोवृत्ती कृती राहुल गांधी यांची कशी आहे ही सिद्ध होते या प्रकरणाचा जाहीर निषेध अकोला भाजपाने केला असून हा नंदनीय प्रकरणासंदर्भात काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी प्रियंका गांधी राहुल गांधी तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर माफी मागावी व दादागिरी करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी केली आहे