पाचोड शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
गावकऱ्यांनी मानले कंपनी व रेडक्रास सोसायटीचे,आभार
आर्वी /भरत जयसिंगपुरे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,पाचोड (ठाकूर)येथे सिडीईटी कंपनी तळेगांव शामजी पंत व इंडियन रेडक्रास सोसायटी आर्वी यांच्या सयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे उपयोगी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याबाबत सविस्तर,वुत्त असे कि आर्वी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाचोड ही शाळा अति दुर्गम व वंचित मागास असुन सर्वच शाळेत शिकणारे विद्यार्थी हे आर्थिक दुष्टया दुर्बल व कमकुवत घटकामध्ये येतात. त्यामुळे ही बाब गांभीर्याने ओळखुन एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या ज्वाज्वल भावनेने आपल्या परिसरातील नामवंत असलेल्या, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात व कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या इंडियन रेडक्रास सोसायटी व CDET कंपनी तळेगांव शा.पं यांनी शाळेत शिकणाऱ्या १६०गरीब विद्यार्थ्यांना पाण्याची बाँटल,नोटबुक, पेन,कंपास, टिफिन बाँक्स व स्फोर्टस ड्रेस असे संपूर्ण शैक्षणिक विद्यार्थी. उपयोगी साहित्याचे मान्यवरातर्फै
वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कंपनीचे जनरल मँनेजर श्री.जयंत पैठणकर,श्री सोमेश साठोणे,इंडियन रेडक्रास संघटनेचे. प्रमुख राजाभाऊ तेलरांधे, अनिल चोरडिया, गोलुभाऊ चोरडिया, रमेश जवजांळ,अरूण ढोक,प्रमोद पाटणी,प्रेमसिंग राठोड सर यांनी आवर्जून उपस्थित राहुल साहित्याचे वाटप केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद राठोड, उपाध्यक्ष दिलीप राठोड, सुधाकर राठोड, मुख्याध्यापक लक्ष्मण बोरवार ,पदवीधर शिक्षक सारगंधर पासरे,दिलीप बुटे,संजय जुनघरे,सुरज लोखंडे, सुशिल चव्हाण, कू.रजनी उंबरकर मँडम यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन श्री पासरे सर तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री लक्ष्मण बोरवार यांनी केले. तर आभारप्रदर्शन सुरज.लोखंडे यांनी करून कार्यक्रमाची राष्ट्रगिताने सांगता करण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी कंपनी. व.रेडक्रास सोसायटीच्या अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.