क्राइम

दोन भामट्यांनी लष्कर जवानाला घातला  १० लाखाने गंडा 

Spread the love
छत्रपती संभाजी नगर / प्रतिनिधीं
                शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविल्यास दाम दुप्पट करून देण्याचे आणि रक्कम डॉलर मध्ये मिळवून देण्याचे आमिष देत ९ लाख ८९ हजार रुपयांनी गंडा घातला आहे. पीडित व्यक्तीच्या तक्रारी वरून त्या दोन भामट्यां वर छावणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्रकुमार रंगबाज सिंह हे लष्करात हवालदार पदावर कार्यरत आहेत. त्यांना सुदीप कुमार आणि सुनील सोलंखे (दोघे रा.छत्रपती संभाजीनगर)  यांनी शेअर मार्केट मधील एफएस ५०० कंपनीत पैशे गुंतवल्यास अल्प  काळात दाम दुप्पट करून देण्याचे आणि मिळणारी रक्कम डॉलर मध्ये मिळवून देण्याचे आमिष दिले. त्यांच्या आमिषाला महेंद्र कुमार बळी पडले . त्यांनी या भामट्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांना ९ लकख ८९ हजार रुपये दिले.
 हा प्रकार २९ एप्रिल ते २४ ऑगस्ट २०२३ या काळात घडला. संदीप कुमार आणि  सुनील सोलंखे यांच्या कडे महेंद्र कुमार यांनी वारंवार पैशाची मागणी करून देखील या दोघांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. महेंद्रकुमार सिंग यांच्या तक्रारी नंतर छावणी पोलीसांनी  या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वैâलास देशमाने करीत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close