हात फाउंडेशन च्या वतीने शालेय साहित्य वाटप
धामणगाव रेल्वे / हितेश गोरिया
आज दिनांक. 8 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी मलातपूर तसेच महिमापूर येथे स्व. श्री सुरेशरावजी बापूरावजी भजभूजे यांच्या स्मृती पित्यर्थ हात फाउंडेशन च्या माध्यमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्रीकांतजी गावंडे (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे ), मा. मंगेश बोबडे ( उपसभापती कृ. उत्पन्न बाजार समिती धा. रे. ), मा. सुजीत भजभूजे ( अध्यक्ष. हात फाउंडेशन ), मा. दिनेश वाघमारे ( उपाध्यक्ष हात फाउंडेशन ) तसेच प्रमुख उपस्तितीत मा. शुद्धोधन मेश्राम ( ग्राम पंचायत सदस्य ) व छगनजी किन्नाके ( ग्राम पंचायत सदस्य ) हे उपस्थित होते तसेच मा. हितेश गोरिया ( गौरक्षा मंच ) ,मा. अनुप भेंडे , मा. निलेश नांदाणे , मा. पाटील सर ( केंद्र प्रमुख तळेगाव ) उपस्थित होते त्याचप्रमाणे मलातपूर जिल्हा परिषद शाळा येथे तेथील शिक्षक मा. उमेश आडे सर यांनी प्रस्तावना व सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच जिल्हा परिषद शाळा महिमापूर येथे तेथील शिक्षक संदीप वाकेकर सर यांनी आभार मानले व अंगणवाडी महिमापूर येथे तेथील शिक्षिका भारती राऊत तसेच मलातपूर येथील अंगणवाडी येथे तेथील शिक्षिका माया काळे उपस्थित होत्या.