शहीद खोब्रागडे अभ्यासिकेचे यश! सरकारी नोकरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पा*
_काजल ठाकूर, शिवानी इसळ, पायल चोंधे, प्रांजली काळे यांचा सत्कार सोहळा_
मोर्शी(तालुका प्रतिनिधी )दि.3ऑग24
शहीद सुभेदार एन के खोब्रागडे वाचनालय तथा अभ्यासिका केंद्र रिद्धपूर येथे नुकताच सत्कार सोहळा पार पडला असून अभ्यासिकेची विद्यार्थिनी कु काजल ठाकूर यांची नागपूर येथे आरोग्य विभागात निवड झाली आहे. त्यासोबतच शिवानी इसळ यांची जलसंपदा विभाग, कु पायल चोंधे यांची कालवा निरीक्षक अमरावती व कु प्रांजली काळे यांची मोजणीदार, अमरावती येथे निवड झाली असून त्यांचा सत्कार सोहळा अभ्यासिकेत आज आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमामध्ये दक्षता समितीचे अध्यक्ष प्रमोद हरणे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ मराठी केंद्र रिद्धपुरच्या प्रभारी प्रा डॉ नीता मेश्राम उपस्थित होत्या. चारही विद्यार्थ्यांनी आपला संघर्ष यावेळी व्यक्त केला. यावेळी काजल ठाकूर समवेत तीनही निवडकर्त्यांच्या पालकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला होता. यावेळी बोलताना संघर्षातून यशाची दारे उघडतात, ग्रामीण भागातील मुलींसमोर अनेक आव्हाने आहेत पण तरीही या आव्हानांवर मात करत मुलींनी यश संपादन केले. मुलींप्रमाणे मुलांसमोर सुद्धा अनेक आव्हानं आहेत पण योग्य दिशा न मिळाल्यामुळे विद्यार्थी भरकटत असून त्यांना मार्ग दाखवण्यासाठी अभ्यासिका व वाचनालय प्रयत्नरत आहे. भविष्यातही असाच निकाल येवो यासाठी सर्वानी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, यशाने हुरळून जाऊ नये तर अपयशाने खचून जाऊ नये कायम पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावा असे मत प्रा डॉ मेश्राम यांनी मांडले. श्री क्षेत्र रिद्धपुर येथील शहीद सुभेदार एन के खोब्रागडे वाचनालय तथा अभ्यासिका केंद्र हे संपूर्णपणे मोफत असून पुस्तकांपासून ते संगणकापर्यंत, झेरॉक्सपासून ते ऑनलाईन फॉर्म भरणेपर्यंत सुविधा मोफत आहे एवढी साधने उपलब्ध असतानाही आपण याचा लाभ घेत नाही अशी खंत प्रमोद हरणे यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी तरुणांपुढील आव्हाने आणि भरकटलेली दिशा, ग्रामीण भागात अभ्यासाच्या दृष्टीने असणाऱ्या सुविधा यावर परखड भाष्य केले. तसेच वाचनालय समितीला भरीव आर्थिक मदतही केली आणि यापुढेही त्यांनी मदतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमामध्ये गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्यांनी सर्व निवडकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भगवानप्रसाद ठाकूर, गजाननराव इसळ, जयप्रकाश गजभिये, सुधीर ठाकरे, अमोल हिवराळे, हिमांशु शेवात्कर, यश घोडेस्वार, हर्षल साळकर, अनिकेत पांडे, दिपक पांडे, आयुष गद्रे, राहुल उभाड, रोशन वानखडे, क्रिश चव्हाण, रोशन अवसरमोल, अमर गजभिये, अमित शिमनीकर,ऋतुजा शिमनीकर, रिता तागडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश गजभिये यांनी तर प्रास्ताविक हेमंत तागडे यांनी केले. आभार रुपेशकुमार लबडे यांनी मानले.