क्राइम

हॉटेल मालका कडून कामगार महिलेचा खून  ; कामावर येत नसल्याने होता नाराज

Spread the love

मधात आलेल्या  मुलाला गंभीर दुखापत

जालना  / नवप्रहार डेस्क 

             हॉटेल।मध्ये कामाला असलेल्या महिलेने कामावर जाणे बंद केल्याने मालक इतका संतापला की त्याने रात्री 2 वा. महिलेचे घर गाठले. घराची कडी वाजवून तिला उठवले आणि तिच्यावर चाकूने वार करत तिचा खून केला. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुकगा बाहेर आला असता त्याने मुलावर देखील वार केले. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा आणि त्याचा मित्र जखमी आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सुभिद्रा वैद्य (वय ४०) या मागील सात-आठ वर्षांपासून परिसरातील लंका हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करत होत्या. चार महिन्यांपूर्वी सुभिद्राबाई यांना मुलगा सचिन वैद्य (वय २०) याने हॉटेलवर कामासाठी जाऊ नको अशी ताकीद दिल्यानंतर महिलेने हॉटेलमध्ये काम करणे बंद केले होते. दरम्यान, हॉटेलमालक गणेश कातकडे (वय ४५) हा कामावर येण्यासाठी महिलेवर दबाव टाकत होता. त्या कामावर जात नव्हत्या. याचा राग मनात धरून आरोपी गणेश कातकडे याने शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास सुभिद्रा वैद्य यांचे घर गाठले. घराची कडी वाजवून दार उघडण्यास भाग पाडले. त्या घराबाहेर येताच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर गणेश कातकडे याने सुभिद्रा वैद्य यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घरात झोपलेला महिलेचा मुलगा सचिन वैद्य हा भांडणाच्या आवाजाने झोपेतून उठून बाहेर आला. गणेश कातकडे याने सचिन वैद्य याच्यावर देखील चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच सचिनच्या मित्राच्या हातावरदेखील वार केले. याप्रकरणी सुभिद्रा वैद्य यांची बहीण शितल ठोके (३१) यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून शनिवारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जखमी सचिन वैद्य यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close