राजकिय

धर्मवीर दिघे साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधत शाखेचे उदघाटन 

Spread the love
असंख्य तरुणांचा शिवसेनेत प्रवेश 
 शिराळा: पवन पाटणकर
 स्थानिक शिराळा येथे 27 जानेवारी रोजी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिराळा शिवसेना शाखेची स्थापना करण्यात आली.
 शिराळा येथील रहिवाशी असलेले राजकीय वारसा लाभलेले शिवसेना अमरावती तालुकाप्रमुख मंगेशभाऊ काळमेघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गावातील शेकडो युवकांनी शिवसेना पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला.
 जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेले मंगेश काळमेघ हे संपूर्ण मतदारसंघा मध्ये सर्वांच्या परिचित व्यक्ती आहे.
 जनसामान्यांचा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
 सदैव जनसेवेसाठी तत्पर असलेले मंगेश काळमेघ यांनी आज पर्यंत अनेक वेळा तालुक्यातील वेगवेगळ्या गावामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान आयोजित केले आहे.
 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकुल  योजना, यासारख्या योजनांचा लाभ तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळावा याकरिता ते सदैव प्रयत्नशील असतात . त्याचप्रमाणे  त्यांच्या पत्नी सौं. भावनाताई काळमेघ या ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे त्या माध्यमातून ग्रामपंचायत मार्फत सुद्धा त्यांनी गावामध्ये रस्त्याचे व नालीचे अनेक बांधकाम करून घेतले.
 व स्वतः सुद्धा शिवसेना तालुकाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ता म्हणून मंत्रालयातून तालुक्यातील अनेक कामे मंजूर करून आणली. अशा या समाजसेवेने झपाटलेल्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गावातील तरुण वर्गांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात प्रवेश केला.
 यावेळी शाखाप्रमुख म्हणून वैभव मुंदाने, शाखा संघटक निलेश कुकडे, उपशाखाप्रमुख स्वप्निल जिभकाटे, शाखा सचिव अर्पित नवरंगे, सहसचिव भूषण पाटणकर, कोषाध्यक्ष कैलास मानकर  यांची नियुक्ती करण्यात आली.
 गावातील मुख्य चौक असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना शाखेच्या बोर्डाचे उद्घाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री शाम भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मीडिया प्रमुख  रितेश देशमुख, पत्रकार तथा युवाशक्ती ग्राम विकास संघटनचे उपजिल्हाप्रमुख पवन पाटणकर, शिवसेनेचे निलेश भाऊ रिठे गौरव नागपुरे, रमेशराव देशमुख, विजयराव देशमुख  व गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
 यावेळी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या युवकांमध्ये रोशन पाटणकर, संकेत जिभकाटे, दिनेश पटले, रितेश घुरडे, अक्षय कावरे, आशिष बांबल, अश्विन बांबल, वेदांत मयांडे, वैभव पटले, आदेश पाठक, साहिल राणे, प्रवीण राऊत, शुभम वाडेकर, कैलाश गंधे, हर्षल मस्के, सुरेश गंधे,आशिष वडे, रोहन बोराळे, अनुप पटले, सुमित निंगोट, राहुल पाटील, कुंदन राऊत, राहुल कवाने, भूषण शेंडे, प्रफुल कडू, सौरभ देशमुख, यश कडू, आशुतोष देशमुख, वेदांत कडू, तेजस टोम्पे, ऋषिकेश मुंदाने, पार्थ खाडे, दिव्यांशू ढेवले, अथर्व घोंगडे, ओम नरंशुकर, मनोज उके, रुपेश भागवत, प्रवीण मेश्राम, आशुतोष पेढेकर, अंकुश तुळे, सतीश पटले, चेतन पाटील, मनीष देशमुख, अक्षय भस्मे, आशिष कडू, समीर सहारे, गणेशराव पाठक, अभिषेक घुरडे, कृष्णा राजगिरे, सोपान ढवळे, बाबू मानकर, राजेश कुकडे, योगेश मानकर, विकास मानकर, दर्शन वाघाडे, संदीप गावंडे, हरीश वाघाडे, बबलू मिसार, पवन शेंडे, अनिरुद्ध शेंडे, लवकेश शेंडे, नितीन वाघाडे, विजय वाघाडे, स्वराज मानकर, सचिन वाघाडे, सुरज जवंजाळ, प्रसाद वानखडे, कल्पेश काळे, सतीश मानकर, प्रतिक उके, नितीन उके, सागर टोम्पे, जय देशमुख, सार्थक टोम्पे, कैलास गंधे, राहुल पाटील, अक्षय पटले, विजेश राणे , हर्षल  किटुकले, गौरव नागपुरे, समीर देशमुख, स्वप्निल देशमुख, प्रशांत मानकर, सुशांत सावरकर, दिनेश तायडे, प्रदीप हटवार, गोलू मेश्राम, दर्शन वानखडे, रमेशराव देशमुख, विजयराव देशमुख, साहिल राणे, अमर ताजने, विजुभाऊ ताजणे, जय देशमुख, ओम देशमुख, ऋषिकेश देशमुख, राहुल देशमुख, सागर टोम्पे, सुशील देशमुख, संतोष यावले, निखिल दहापुते, राजेश राणे, सुरज उके, अमोल जवंजाळ, प्रेम जिभकाटे, वैभव मुंदाने, स्वप्निल जिभकाटे, अर्पित नवरंगे, भूषण पाटणकर, कैलाश मानकर, निलेश कुकडे, प्रतीक कोल्हे, या सर्व युवकांनी शिवसेना अमरावती तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केला.

 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेशभाऊ काळमेघ यांच्याशी चर्चा केली असता. त्यांच्या मतानुसार पुढील वर्षभरामध्ये 2026 पर्यंत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये “गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक “याप्रमाणे तालुका व मतदार संघामध्ये जास्तीस जास्त लोकांना शिवसेना पक्षांमध्ये जुळविण्याचा संकल्प त्यांनी घेतल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती सदस्य असल्यामुळे मतदार संघातील महिलांना योजनेच्या लाभ घेताना येणाऱ्या समस्यांसोडविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले.येणाऱ्या पुढील काळात संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व मोठया प्रमाणात निर्माण करण्याचा उद्देशअसल्याचे सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close