धर्मा वानखडे यांची ह्यूमन राईट्स कॉन्सिल ऑफ इंडिया, सिटी प्रेसिडेंड पदी निवड.
अमरावती:: आपल्या शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करणारे सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे अमरावतीचे सुपुत्र धर्मा वानखडे यांची ह्यूमन राईट्स कॉन्सिल ऑफ ऑफ इंडिया सिटी प्रेसिडेंट पदी, राष्ट्रीय अध्यक्ष, हाजी शेख यांनी नुकतीच नियुक्ती केली.
धर्मा वानखडे हे अनेक वर्षपासून पथनाट्य,एकांकिका,शॉर्ट फील्म च्या माध्यमातूम समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहे. तसेच त्यांच्या शॉर्ट फिल्म ला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहे. आता या भारतीय मानवाधिकार परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वच वर्गातील लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, सर्वांनी एकजूट होऊन कार्य करने .आता हि जबाबदारी,संपूर्ण वर्गाची आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.