सामाजिक

धनगर समाज आरक्षणाचा उपोषणाचा तिसरा दिवस

Spread the love

यवतमाळ / अरविंद वानखडे

यवतमाळ येथील आझाद मैदानात दिनांक 2 ऑक्टोंबर पासून धनगर समाजाने उपोषण सुरू केले असून समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व धनगर समाज एकवटला आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी. मेंढपाळ बांधवांसाठी मेंढी चराई साठी कायमस्वरूपी चराई क्षेत्र उपलब्ध करून देणे, तसेच एका रुपयात मेंढीचा विमा काढण्याचा आदेश जारी करावा, ह्या अशा प्रकारच्या सर्व मागण्या शासनाने त्वरित मान्य करावेत अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपोषण करते पवन धोटे यांनी दिला आहे.
धनगर समाजाचे नेते बाळासाहेब शिंदे, वसंताजी ढोक, कृष्णा कांबळे अमोल कचरे, प्रदीप उनसे, राजकुमार लकडे, नितीन कोरडे, पुंडलिक देवकते, भास्कर उघडे, रामचंद्र महाले( नेर ) श्रीमान साव साहेब, बालदेव गायनार मारोतराव येवले ( पांढरकवडा ) यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व पाठिंबा ही जाहीर केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close