सामाजिक

धनगर समाज  बांधवा कडून रास्ता रोको आंदोलन 

Spread the love
धामणगाव  रेल्वे / प्रतिनिधी
                    आज सकाळी जुना धामणगाव चौफुलीवर धनगर समाज बांधवा  कडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पंढरपूर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत हे आंदोलन उभारण्यात आले.
                          एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले असून पंढरपूर येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे. त्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जुना धामणगाब चौफुली वर धनगर बांधवाच्या वतीने रास्ता रोको करन्यात आला.
प्रमुख मागण्या – 
१) धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणुन कार्यरत आहेत. १९५६ साली अनुसुचीत जमातीच्या (एस.सी., एस.टी.) यादी “धनगड” नावाची नावाची जमात दाखल करण्यात आली. ज्यामुळे धनगर जमात गेल्या ६८ वर्षापासून त्यांच्या संवैधानिक हक्कापासुन वंचित राहीला आहे. “धनगड” नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक घडलेली आहे.
२) महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तिन वेळा स्पष्ट केले आहे की, “धनगड” जमात अस्तित्वात नाही, मात्र धनगर जमात अस्तित्वात आहे. त्यामुळे धनगर जमातीला अनुसुचीत जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरीता त्वरीत शासन निर्णय काढणे आवश्यक आहे.
३) “धनगड” नावाची जमात १९५६ आणि त्याआधीही महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती. परंतु धनगर जमात अस्तित्वात होती आणि आहे. त्यामुळे “धनगड” च्या जागी “धनगर” जमातीला अनुसुचीत जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम ३४२ (१) नुसार आवश्यक आहे.
४) पंढरपूर आणि लातुर येथे मागील १२ दिवसापासून आमरण उपोषय सुरू आहे. उपोषण कर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असुन महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांच्या भावना तिव्र आहे.
५) पंढरपूर येथील आंदोलना दरम्यान ३ व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. १५ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत, मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते,
६) आतापर्यंत अनेक सरकारनी धनगर समाजाची केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याचवेळा दिशाभूल केली असल्याने जमातीमध्ये अजुनही सरकार केवळ दिखावा अथवा वेळ काढुपणा तर करीत नाही ना ? अशा भावना येऊ लागल्या आहेत. तरी महाराष्ट्र शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा,
 या प्रसंगी सुरेश गावंडे,
प्रदिपराव बावल, नरेश राप सावरकर, गजानन राव  गधे, सुखदेवटाव महाल, हनुमंतराव गधे,  बबनराव ढोक
मनोहराव गधे,   अशोकराव महाले
 गोवर्धन मुहाने,  ओंकार उंदछे,  विजय वैद्य, संजय सावताकर, नितेश गधे,  प्रविण पुणसे, दिपक गंधे,  किशोर महाये
,  शशिकांत दे. कडे,  मुकेश दे. कडे.
,  दिनेश आ. कडे.  रविन्द्र, रा. कडे.
, प्रकाश ना. कडे.,  सुभाष नर महाले
,  प्रतिक वि धवने, सुरेश धनजोडे,  गौरव महाले,  अक्षय ध. कई,  दिलीप कापडे,  अविनाश गंधे, रचातिल थोटे
,  शरद महात्मे,  मंगेश गंधे,  उत्तम गंधे
मुखादा) राहुल जुडे,  गणेश में महाले
 संजय ग. साव प्रशातश ठेवले
 प्रदीप गायनर, अनुप गायबर -, सनेश गायनर 48) सुभाषराव गायनर,  दुर्गेश निधार,  सौलता सं निघीय 52) प्रमोद ज. महाले  संख्य निघोट,  राजेश शा. धवजे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close