Uncategorized
धामणगाव रेल्वे – आर्वी बस चा अपघात ; प्रवाशांचे बेहाल

सहा तास प्रवासी विना पाणी आणि उपाशी
दुचाकी स्वार बस घेऊन आला मंगरूळ ठाण्यात
जवळपास सहा तास प्रवाश्यांना घ्यावा लागला झाडाचा सहारा
चांदुर रेल्वे डेपो मॅनेजर चा मोबाईल लागता लागेना
प्रहार तालुका प्रमुख सूरज गंथळे यांनी जाऊन प्रवाशांची आस्थेने केली विचारपूस
धामणगाव रेल्वे / विशेष प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे वरून आर्वी ( वरूड बगाजी मार्ग) जाण्यासाठी निघालेल्या बस आणि दुचाकीत अपघात झाल्याने दुचाकी चालकाने प्रवाश्यांना बस मधून उतरवून बस सरळ मंगरूळ ठाण्यात आणल्याचे समजते. त्यामुळें प्रवाश्यांना जवळपास सहा तास बिना अन्न पाण्याचे राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रहार चे तालुका प्रमुख सूरज गंथळे यांना हा प्रकार समजताच ते आपल्या कार्यकर्त्यांसह पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीट चे पॅकेट घेऊन घटनास्थळी पोहचले आणि प्रवाशांची आस्थेने विचारपूस करत त्यांना खायला आणि प्यायला दिले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार धामणगाव रेल्वे वरून चांदूर आगाराची बस आर्वी जाण्यासाठी निघाली असता, वरूड बग्गाजी जवळ बस ने दुचाकी धडक दिल्याचे समजते. त्यानंतर दुचाकी स्वार बस सरळ मंगरूळ दस्तगीर ठाण्यात घेऊन आला. बस चालक आणि वाहकाने प्रवाश्यांना घटनास्थळीच उतरवून दिले.
चालक आणि वाहक जबाबदारी विसरले – अशा प्रसंगी डेपो मनेजर ला घटनेबद्दल माहिती देऊन प्रवाशांसाठी दुसऱ्या वाहनाची सोय करून देण्याची जबाबदारी ही चालक आणि वाहक यांची असते. पण त्यांनी प्रवाशांची कुठलीही काळजी केली नाही.
जवळपास सहा तास प्रवासी विना अन्न पाण्याचे – प्रवाश्यांना घटनास्थळी सोडून चालक आणि वाहक बस घेऊन मंगरूळ दस्तगीर ठाण्यात आले. आणि प्रवाश्यांना तेथेच सोडून दिले. प्रवासी दुसऱ्या बस ची वाट पहात जवळपास सहा तास त्याच ठिकाणी बसून होते.
डेपो मॅनेजर चा फोन लागता लागेना – बस चांदूर रेल्वे डेपो ची असल्याने अनेकांनी डेपो मॅनेजर ला कॉल करण्याचा प्रयत्न केला.पण त्यांचा कॉल लागत नव्हता.
सूरज गंथळे यांना माहिती होताच ते कार्यकर्त्यांसह पोहचले घटनास्थळी – या बद्दल प्रहार तालुका प्रमुख सूरज गंथळे यांना होताच ते आपल्या कार्यकर्त्यांसह पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीट चे पॅकेट घेऊन घटनास्थळी पोहचले. आणि प्रवाशांची आस्थेने विचारपूस करत त्यांना धीर दिला.
चालक, वाहक आणि डेपो मॅनेजर वर कारवाई होणे आवश्यक – प्रवाश्यांना उन्हाळ्याच्या दिवसात असे उतरवून देणे हे योग्य नाही. चालक आणि वाहक यांनी डेपो मॅनेजर ला व बद्दल कल्पना देऊन दुसऱ्या बस ची सोय करणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे केले नाही. एक जबाबदार अधिकारी म्हणून डेपो मॅनेजर यांचा कॉल लागणे देखील आवश्यक होता. नेमके डेपो मॅनेजर काय करत होते याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सूरज गंथळे यांचे म्हणणे आहे.

प्रवाशांसाठी धावून जाणारे सूरज गंथळे



