देवयानी झरेकर हिची अमेरिकेमध्ये पदव्युत्तर रिसर्च फेलोशीप साठी निवड .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – देवयानी अविनाश झरेकर हिची अमेरिकेमध्ये सायबर सिक्युरिटी विथ ए.आय. या विषयातील संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे.
पारनेर तालुक्यातील दरोडी जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक दत्तात्रय झरेकर यांची नात व शिक्षक नगरच्या हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालयातील प्राध्यापक अविनाश झरेकर यांची देवयानी ही मुलगी आहे . या पदव्युत्तर रिसर्च फेलोशीप निवड प्रक्रियेमध्ये पुण्यातील तब्बल २६७ उमेदवारांनी सहभाग घेतला होता. त्यातील निवडक २० जणांच्या चमू मध्ये देवयानी झरेकर ला स्थान मिळाले आहे. यात पुण्यातील सी.ओ.ई.पी. सह इतरही अनेक प्रथितयश अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे .पुढील आठवड्यात सदर उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ती प्रस्थान करणार आहे.
देवयानी च्या या यशाबद्दल तिचे वडील प्रा .अविनाश झरेकर म्हणाले की ,आपणां सर्व सुहृदांचे आशिर्वाद आणि सदिच्छा तिला या प्रवासात नक्कीच साथ देतील! भावनाभिव्यक्तीच्या हिंदोळ्यावरील आम्हां कुटुंबीयांच्या आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण! या आनंदाच्या क्षणात आपणांसही सामावून घेत आहोत! ] [ * चौकट –
पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दरोडी प्राथमिक शाळेत १९८७ – १९९४ हा कालखंड मला चांगला आठवतो , त्यावेळी मला
दत्तात्रय झरेकर हे प्राथमिक शाळेत इंग्रजी अफलातून शिकवत असे . खरं तर त्या काळात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेने पदवीधर बी एड शिक्षक नियुक्त केले होते . त्यामध्ये झरेकर गुरुजींची खास निवड झाली होती . त्यांनी स्वतः प्रामाणिक पणे आपला शिक्षकी पेशा सांभाळून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले . त्याचाच परिपाक म्हणून त्यांची मुलं देखील उच्चशिक्षित आहेत . त्यांचा अविनाश हा मुलगा नगरच्या प्रसिद्ध असलेल्या सारडा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून अतिशय उत्तमरित्या काम करत असून विज्ञान शाखेत शिक्षण घेवून रसायन शास्त्राचा नामवंत प्राध्यापक म्हणून तो उत्कृष्ठरित्या नामवंत प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत . संतांच्या उक्तीप्रमाणे ‘ शुद्ध बीजापोटी , फळे रसाळ गोमटी ‘, तसं अविनाश ची मुलगी देवयानी संपूर्ण भारत देशातून जी काही २० टॉपर मुलं निवडले जातात , त्यातून देवयानी चा नंबर लागला, ही सामान्य बाब नाही . मास्टर्स करण्यासाठी देवयानी आता परदेशात जाते आहे . यातून पालकांनी एक धडा निश्चित घेतला पाहिजे की , आपण सदयस्थितीत किती ही पैसा कमावला , गाड्या घेतल्या , जमिनी घेतल्या , फ्लॅट घेतले , गुंठेवारी जागा घेतल्या . घरी आलिशान सर्व सुखसोयी उपलब्ध असल्या, म्हणजे आपण यशस्वी झालो असे नाही . मित्रांनो खरी संपत्ती आपली मुलं असतात . देशात , जगात हीच मुलं , जेव्हा उच्च स्थानावर जातात , तेव्हा ती खरी आई – वडीलांची संपत्ती असते . आज देवयानी हे एक उत्तम उदाहरण आहे ,परंतू आपल्या मुलांना त्यातून प्रेरणा घेण्यासाठी देखील पुरेसे आहे . नाही तरी गावोगावी भाई , दादा , नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यात व्यस्त असणाऱ्या तरुणाईनं नक्कीच देवयानी चा आदर्श घेतलाच पाहिजे . पुनश्च अभिनंदन देवयानी आणि तिच्या पालकांचे .
हभप किसनराव महाराज पावडे सर ,
** प्रशासकीय अधिकारी – बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग .]