देवधरी जि.प.उच्च प्राथमिक शाळा स्नेह सम्मेलन संपन्न.
घाटंजी तालुका प्रतिनिधि- सचिन कर्णेवार.
घाटंजी- देवधरी जि. प. उच्च प्राथमिक शाळा येथे २६-१-२४ रोजी शाळेतील मुलांच्या सुप्त कलागुनांना वाव देण्यासाठी शाळेच्या प्रांगणात स्नेह सम्मेलन घेण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विजय कडु होते तर प्रमुख पाहूणे व्यवस्थापण समिती उपाध्यक्षां सोनाली सं मोहजे ,सरपंच संगिता राऊत,उपसरपंच निकेतन खडसे, पोलीस.स्टेशन पारवा चे राठोड साहेब,पोलीस पाटील राजेंद्र ठाकरे,संदिप राऊत, राजू पलकंडवार,विश्वास निकम, मुख्याध्यापक सुधाकर भोयर सर पत्रकार सचिन कर्णेवार यांची उपस्थिती होती.स्नेह सम्मेलन सुरवात माण्यवरांन शुभहस्ते फीत कापुन व सावित्रीबाई फुले यांच्या वेषभूषा करुन असलेल्या चिमुकलीच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. उपस्थित माण्यवरांचे पुषगुच्छ देउन शाळेकडून सर्वांगीण करण्यात आले. या कलामंचावर चिमुकल्यांनी आपल्या विवीध गाण्यावरील नृत्यानी उपस्थिताचे मन जिंकली त्यात व्यसनमुक्ती, तंबाकू सोडा कॅन्सरची चेन तोड़ा. दारु करी दारोदार यासखरखी नकल करत व्यसमुक्ती अभियानचं मुलांनी कार्यक्रमातू न चालविले.
गावातील शांतता व सलोखा आबादीत रहावा व अफवावर विश्वाश न ठेवता गावात एकी रहावी यावर आधारीत एकपात्री नाटक ‘फोकनाड वार्ता’ गावातील गोमती पात्र नक्कल करुन एका विद्यार्थ्यांनी उपस्थितात हसून हसून पोट धरण्यास भाग पाडले. कार्यक्रमास उत्तम नियोजन शाळेच्या वतिने करण्यात आले यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य चे ग्राम पंचायत सर्व सदस्य गावातील यूवक वर्ग, महिला भगिनी यांचे सहकार्य मिळाले.कार्यक्रमात देवधरी,नागेझरी, नवीन देवधरी व रायसा येथील विद्यार्थानी भाग घेतला.संचालन गणेश साबापूरे सर यांनी केले तर,उपस्थितांचे आभार अतूल वानखेडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक निळकंठ गुड्डा,कुछ. छाया भेंडारकर,प्रशांत दीडशे,सर्व गणेश मंडळ,दूर्गा मंडळ व युवकांनी परिकश्रम घेतले.