खेळ व क्रीडा

विद्यार्थ्यांनो जिद्द आणि चिकाटीच्या बळावर क्रीडा क्षेत्रात करिअर बनवा*: देव चौधरी (आंतरराष्ट्रीय धावपटू)

Spread the love

सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव}

यवतमाळ / प्रतिनिधीO

सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासाकरिता खेळाचे महत्वपूर्ण योगदान असते.विविध खेळ व क्रीडा प्रकाराद्वारे विद्यार्थ्यांना खेळाबद्दल विशेष रुची तसेच माहिती प्राप्त होते. त्याबरोबरच त्यांच्यामध्ये सांघिक उत्साह व नेतृत्वगुणांचा विकास होऊन, क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत अशा स्पर्धेचे आवर्जून आयोजन करण्यात येते.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ.स्मिता घावडे, माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी,यवतमाळ, प्रमुख पाहुण्या म्हणून जवाहर शिक्षण संस्था,यवतमाळ च्या सचिव सौ.कल्पना मांगुळकर, विदर्भ कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष तथा शिव फिटनेस सेंटर, यवतमाळ चे संचालक श्री.अविनाश लोखंडे, सत्कारमूर्ती म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला भारताचा ऍथलेटिक महासंघाचा वेगवान धावपटू व यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी देवगण चौधरी, महाराष्ट्र हॉकी महासंघाच्या उपाध्यक्षा सौ.मनीषा आकरे सुसंस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव श्री.संजय कोचे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.बालाजी वाकोडे,टाटाजी व इतर सन्माननीय सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून क्रीडा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. सर्वप्रथम पाहुण्यांचा संक्षिप्त परिचय शाळेच्या समन्वयिका सौ.वैशाली चौधरी यांनी करून दिला.तदनंतर मान्यवरांचे पुष्पगुछ शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यातआले.सन २०२३-२४ च्या माध्यमिक शालान्त परीक्षेत शाळेतून पहिली आलेली विद्यार्थिनी कुमारी कृष्णाई रजनी अरविंद पिसे हिचा शाळेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच शालेय प्रार्थनेच्या दैनंदिन कामकाजात विशेष योगदान देणाऱ्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी अनुक्रमे कुमारी क्रिषा पवार व स्वरा सरोदे यांचा उपस्थित पाहुण्यांसमोर सन्मान करण्यात आला.प्रास्ताविकाच्या माध्यमातून मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाचे महत्व पटवून दिले व स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.तदनंतर शालेय प्रार्थना हम को ‘मन कि शक्ती देना……..’,श्लोक पठण व ध्यान द्वारे कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीला इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार व मनोरा चे सुंदर सादरीकरण केले. पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी म्युझिकल बॉल ड्रिल, म्युझिकल फ्लॉवर ड्रिल, म्युझिकल मास ड्रिल अशा अनोख्या शारीरिक कसरतीचे सुंदर सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी पाहुण्यांची, पालकांची व उपस्थितांची मने जिंकली. जवळपास आठवड्या पासून सुरवात करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारामध्ये कबड्डी, लगोरी, खो-खो,लंगडी अशा विविध सांघिक खेळाचा शाळेतील चारही गृहा साठी आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कबड्डी व खो-खो (मुले) प्रकारात ऐलो हाऊस, लगोरी व खो-खो (मुली) प्रकारात ग्रीन हाऊस चे संघ अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यांमध्ये विरोधी संघावर मात करीत ‘सुसंस्कार चषकाचे मानकरी ठरले.तसेच नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी धावण्याची शर्यत व कलेकटिंग बॉल, अरेंजिंग ग्लास, गेटिंग रेडी फॉर स्कूल, सांता रेस, अम्ब्रेला रेस, प्लेट अँड बॉल, बुक बॅलेंसिन्ग, हेन रेस, ग्लास बॅलेंसिन्ग, हॉकी स्टिक अँड बॉल, रिंग रेस, लेमन अँड स्पून, सॅक रेस, थ्री लेग, वन लेग रेस, ग्लास रिले रेस, ड्रिबलिंग बॉल, पासिंग बॉल अशा विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मनोरंजन करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना धावण्याच्या व विविध खेळाच्या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या व पालक प्रतिनिधीच्या हस्ते सुवर्ण, रजत व कांस्य पदके तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करून उत्साह द्विगुणित करण्यात आला. त्याबरोबरच कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षक व पालकांसाठी सुद्धा खेळाचे आयोजन करून, विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवान्वित करण्यात आले.तसेच कार्यक्रमाला आपल्या पाल्याना प्रोत्साहित करण्यासाठी पालकांची विशेष उपस्थिती लाभली.
शेवटी मार्गदर्शनपर भाषणांच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी लागणारी जिद्द,चिकाटी व मेहनतिचे महत्व पटवून दिले तसेच आपल्या प्रेरणादायी विचाराद्वारे त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.अशाप्रकारे राष्ट्रगीताद्वारे क्रीडा दिवसाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यासाठी, व कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ.राखी नहाते, मेघा केवटे, शालेय वार्षिक वृत्तांत वाचन अक्षता मारडकर तर कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे यांनी आभार व्यक्त केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close