क्राइम

बलात्कार पिडीतेचा तक्रार मागे घेण्यास नकार : आरोपी कडून कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या

Spread the love

पळून जाणारे आरोपी आणि पोलिसात चकमक , एक आरोपी जखमी

कौशंबी / नवप्रहार मीडिया

                 बलात्कार पीडितेला धमकी देऊन देखील ती तक्रार मागे घेत नसल्याने ती तिच्या वहिनी सह न्यायालयातून परतत असताना तिच्यावर कुऱ्हाडीच घाव घालत तिची हत्या करण्यात आले. मुख्य म्हणजे ही हत्या गावकऱ्यांसमोर करण्यात आली. यावेळी गावकरी मुकदर्शक बनून तमाशा पाहत उभे होते.

          उत्तरप्रदेश च्या कोशंबी जिल्ह्यातील पीडित तरुणीवर पवन आणि सहकाऱ्याने बलात्कार केला होता. त्यामुळे त्याला शिक्षा झाली होती. तो १५ दिवसांपूर्वी जेल मधुन सुटून आला होता. तो आणि त्याचा भाऊ अशोक पिडीते वर तक्रार मागे घेण्यास दबाव टाकत होते. पण तिचा त्यासाठी नकार होता. घटनेच्या दिवशी पीडिता आपल्या वहिनी सह न्यायालयातून परतत असताना पवन आणि त्याचा भाऊ अशोक व सहकाऱ्यांनी तिला रस्त्यात अडवून पुन्हा तक्रार मागे घेण्यासाठी म्हटले. पण तिने नकार दिला.

         यामुळे पवन आणि अशोक संतापले आणि त्यांनी तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले.त्यात तिचा मृत्यू झाला.यानंतर आरोपी घरी आले आणि त्यांनी घराला कुलूप लावून पलायन केले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. आरोपी पकड मध्ये येत नसल्याने त्यांच्यावर २५ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले. दरम्यान उत्तरप्रदेश पोलिसांना आरोपी महेवाघाट येथे लपले असून ते मध्यप्रदेश मध्ये पळून जाण्याचा तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पकडण्याची योजना आखली.

             त्यांनी  महेवाघाट पोलीस ठाणे क्षेत्राच्या रामनगर यमुना कछार पोलिसांना कळवून त्यांची मदत मागितली. ते आरोपी लपलेल्या ठिकाणी पोहचले. पोलीस आल्याचे कळताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरले होते. पोलिसांनी आपल्याला घेरले आहे हे समजताच त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रतिउत्तरां दाखल पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला. त्यात मुख्य आरोपी पवन क्या दोन्ही पायांना गोळी लागून तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला अटक करून रुग्णालयात भरती केले आहे. ही बाब वरिष्ठांना कळताच वरिष्ठांनी रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close