ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे आलेगाव येथे उद्घाटन !
पातूर / रामहरी पल्हाड
पातूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशामध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ठीक ठिकाणी उद्घाटन झाले एकूण ५११ केंद्रांचे लोकार्पण झाले त्यामध्ये आलेगांव केंद्राचे उद्घाटन दि १९/१०/२०२३ रोजी नूतन विद्यालय आलेगाव येथे पार पडले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक विधान परिषद सदस्य वसंतजी खंडेलवाल तर अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष किशोर मांगटे पाटील होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी आमदार बळीराम सिरस्कार, पातूर तहसीलदार काळे , जिल्हा कौशल्य भाजपा पातूर तालुका अध्यक्ष भिकाजी धोत्रे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाकोडे,नूतन विद्यालयाचे अध्यक्ष सुभाषजी जैन,हिरसिंगजी राठोड, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश बिटोडे,नानासाहेब देशमुख,आलेगाव चे उपसरपंच रियासतबी जलालोद्दिन, कपिल खरप हे यावेळी युवकांच्या विकासासाठी घेतलेले पतप्रधनांचे हे एक मोठे पाऊल ठरणार आहे असे विचार यावेळी किशोर मांगटे पाटील यांनी व्यक्त केले.युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी ग्रामीण कौशल्य विकास केंद्र मैलाचा दगड ठरणार आहेत. यामध्ये वेगवेगळे स्किल डेवलोपमेंट तथा तंत्र शिक्षण युवकांना मिळणार आहे .कुशल तरुणाची फौज तयार करण्याचा मानस या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र यांच्या माध्यमातून होणार असल्याचे यावेळी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला भगिनींची विशेष उपस्थिती होती.