सामाजिक
तुम्हीच सांगा साहेब ! आम्ही घरी कसे जावे !!
विद्यार्थी बस ची वाट पाहत रात्री 10 वा. पर्यंत ताटकळत होते उभे
6 वा. ची बस रात्री 10 वा. पर्यंत आली नाही
अधिकाऱ्यांना दोन केल्यावर गाडी निघाली असे नेहमी एकच उत्तर
धारणी / प्रतिनिधी
शाळकरी विद्यार्थी संध्याकाळी 6 वा पासून बस ची वाट पाहत रात्री 10 वा.पर्यंत उभे असताना देखील बस न आल्याने आता तुम्हीच सांगा साहेब आम्ही घरी कसे जावे असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्याचे ठिकाण असल्याने धारणी येथे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी तर नागरिक खरेदी साठी जंगलात असलेल्या गावातून येथे खरेदीसाठी अथवा अन्य कामासाठी येतात. खोखमार ,चौराकुंड,चोपण येथे जाण्यासाठी धारणी वरून संध्याकाळी 6 वा. ची बस आहे.पण काळ ती रात्री 10 वा.देखील धारणी येथे पोहचली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिक रात्री 10 वा.पर्यंत बस ची वाट पाहत ताटकळत उभे होते.
परतवाडा डेपो चे ‘ गाडी निघाली ‘ असे नेहमीचे उत्तर – विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिक नवस ची वाट ओहत असतांना उभे असल्याचे पाहून त्यांना विचारणा केली असता त्यांनी 6 वा. ची बस आली नसल्याचे सांगितले. काही लोकांनी परतवाडा डेपोला।फोन केला असता ‘ बस निघाली आहे ‘ हेच उतार ऐकायला मिळत होते.
विद्यार्थ्यांसोबत काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ? – खोखमार हे गाव अति दुर्गम जंगलात बसले असून सदर गाव हे हरीसाल पासून 28 किमी लांब आहे. अश्यात विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1