पारडी – आष्टी रस्त्याचे नुतनीकरण करा.- मागणी
अन्यथा आंदोलन – पारडी ग्रा.पं सदस्यांचा इशारा
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : पारडी ते नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्ग व पारडी ते आष्टी रस्त्याचे नुतनीकरण करणे बाबतचे निवेदन तहसीलदार कारंजा यांना देण्यात आले. कारंजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पारडी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत आहे. पारडी ते नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्ग ला जोडणार्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे. परिसरातील अनेक गावांचा पारडी ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला पारडी ते सारवाडी फाटा रस्ता खड्याच्या विळख्यात सापडला आहे. या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पारडी, पालोरा, एकांबा, बोटोना या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांना पारडी येथे बँक, दवाखाने, खते-बियाणे खरेदी करण्यासाठी यामार्गे प्रवास करावा लागतो. मात्र, रस्त्यांची बिकट अवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना या खड्डेमय रस्त्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबधित विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरूस्ती करावी पारडी परिसरातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पारडी ते आष्टी या रस्त्याने गाडी चालणे सुद्धा मुश्किलीचे झाले आहे. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याचे नुतनीकरण होत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ दिवसांत यावर कार्यवाही करावी. अन्यथा मोठ्या प्रमाणत आंदोलन करण्यात येईल अशा इशारा पारडी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे . मागे तात्पुरते खर्डीकरण केले, परंतु हा त्याचा वर कायमस्वरूपी तोडगा नाही. खर्डीकरण नंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे तशीच आहे. पारडी, हेटी (पारडी), एकांबा व पालोरा येथील नागरिकांच्या शेती या रस्त्यालगत आहे. त्याचा अर्थ सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याची झालेली दुरवस्था व गंभीर परिस्थिती पाहता प्रत्येक नागरिक शाळकरी मुले, दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहतूक प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघातांची मालिका सुरू झालेली आहे.
आष्टी – थार – बोटोना – पारडी रस्ता जीवघेणा ठरत आहे. गर्भवती महिलाना धोका निर्माण होत आहे. सदर रस्त्यावरून ये जा करण्याऱ्या गर्भवती महिलांच्या गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे, चिमुकल्याला जगात येण्याआधी जगाचा निरोप घ्यावा लागतो आहे. या रस्त्यावरून ये जा करणार्या विद्यार्थी, नागरिक, महिला, दुग्धव्यवसाय करणारे व्यावसायिक, वृद्ध मंडळी या रस्त्यामुळे सर्वाना येत आहे कुठले ना कुठले आजारपण येत आहे.रस्ता सोडून बाजूने मार्गक्रमण नागरिक करताहेत अशी असणारी परिस्थिती आहे.
रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती, डांबरीकरण व नूतनीकरण याची सर्व जबाबदारी बांधकाम उपविभाग यांच्यावर राज्य सरकारने नीच्छित केली आहे. रस्ताचे नुतनीकरण करून नागरिकांना त्रासातून मुक्तता द्यावी अशी मागणी आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अजूनही रस्त्याची वणवण ही मन हेलावणारी आहे. आपण या कडे गांभीर्याने लक्ष देऊन मार्ग काढावा अशी विनंती पारडी ग्रामपंचायत सदस्य राखी पाटील, तेजस्वीनी यावले, प्रभा पाठे यांनी निवेदनातून केली आहे.