अपघात
दुभाजकावर आदळून खाजगी बस पलटी ; चार प्रवाशी गंभीर जखमी

जळगाव / नवप्रहार मिडिया
मुंबई- नागपूर महामार्गावर असलेल्या पिंपळ- कोठा गावाच्या हद्दीत एक खाजगी बस दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात 4 लोक गंभीर जखमी झाले आहेत. दुभाजकावर आदळून बस पलटी झाल्याने हा अपघात घडला आहे.
4 प्रवासी गंभीर जखमी
या अपघातामध्ये चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्सचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1