दलित वस्तीत सुसज्ज अभ्यासिका स्थापन करण्याची मागणी
अचलपूर नगर परिषद हद्दीत 13 दलित वस्ती मात्र विकासापासून दुर !रिपब्लिकन पार्टी ऑफइंडियाची मागणी
अचलपूर प्रतिनिधी -किशोर बद्रटिये -: – अचलपूर नगरपरिषद हद्दीतील अनुसूचित जाती नवबौद्ध तसेच दलित वस्तीत अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सर्व सोयी सुविधा युक्त असे वाचनालय बांधून देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अचलपूर च्या वतीने मुख्याधिकारी नगरपरीषद अचलपूर यांना निवेदन देऊन केली आहे .
अचलपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदना त म्हटलेआहे की अचलपूर परतवाडा शहरात मोजकीच अभ्यासिका वाचनालय आहेत परंतु ही वाचनालय खाजगी असल्यामुळे त्या ठिकाणी अभ्यासिका लावणे गोरगरीब दलित मुलांना विद्यार्थीविद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या शक्य नाही त्यामुळे अचलपूर नगरपरिषद हद्दीतअसलेल्या सुलतानपुरा सर्वईपुरा अब्बासपुरा मेहरापुरा सराईपुरा , बेगमपुरा ,विठ्ठल वाडी ,विदर्भ मिल चाळ , माळवेशपुरा ,ठिक्रीपुरा , टपालपुरा ,आठवडी बाजार बुद्ध विहार , देशमुख प्लॉट आदी अचलपूर परतवाडा शहरातील १३ दलीत वस्ती आहेत या दलित वस्तीत दलितांना शैक्षणिक दृष्ट्या पुढे जाण्याकरिता व शासकीयनोकरी करिता स्पर्धात्मक युगात अभ्यासिकांची अत्यंत गरज आहे .परंतु या दलित वस्तीत विकास झाला नाही म्हणून विकासाचा भाग म्हणून नगरपरिषदेच्या वतीने दलित वस्तीत सर्व सोयी सुविधायुक्त असे वाचनालय बांधून द्यावे तसेच सदर वाचनामध्ये स्पर्धा परीक्षांचे पुस्तके वाचण्याची व्यवस्था , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , प्रसाधनगृहाची व्यवस्था , पुस्तकासाठी फर्निचर ,अशा सोयी अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधून देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर रिपाई चे किशोर मोहोड ,प्रभाकर मोहोड , शंकर इ�