सामाजिक

सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी

Spread the love

ओंकार काळे / मोर्शी

परभणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी नामक आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र शासनाने दोषीवर कठोर कारवाई करण्यात येऊन शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार मोर्शी यांना मोर्शी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष इंजि. मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वात देण्यात आले .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतड्यासमोरील संविधानाच्या वास्तुशिल्पाची मोडतोड झाल्यानंतर तेथील आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या असता पोलिसांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड मोहिम राबविली, कोम्बिन्ग ऑपरेशन राबविले, अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले असता.न्यायालयीन कोठडीत असलेला सोमनाथ सुर्यवंशी नावाचा आंबेडकरी कार्यकर्ता तुरुंगात मृत्युमुखी पडल्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असुन या घडलेल्या प्रकाराला जबाबदार संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणिकरिता मोर्शी तालुका काँग्रेस कमेटी(अनुसूचित जाती विभाग)चे तालुकाध्यक्ष इंजि मिलिंद कांबळे व मोर्शी शहर काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष भुषण कोकाटे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ साऊथ, प्रफुल्ल भोजने यांच्या नेतृत्वात तहसीलदार मोर्शी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बाबाराव इंगळे, अंबादास राऊत, ईश्वर श्रीसाठ,संजय कांबळे, गजानन वानखडे,गौतम पांडे ,शेखर साबळे,निळू इंगळे तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close