राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे भेट ; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
राज्यात अलथापालथ सुरू आहे. राष्ट्रवादीतून अजित पवार हे आपल्या 40 समर्थकांसह शिंदे- फडणवीस सरकार मध्ये दाखल झाले आहेत. तर ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘ जय महाराष्ट्र ‘ करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.नागरिकांत याला घेऊन चर्चा सुरू असतांनाच आणखी एक न्यूज चर्चेत आली आहे.राज ठाकरे यांनी शिंदे यांची त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे.
एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मागणी करीत असताना आणि तश्या आशयाचे बॅनर झळकत असतांना राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीमुळे विविध चर्चा रंगात आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जात त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता विविध प्रकारच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
एकीकडे मनसे नेते अभिजित पानसे यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्या गाडीतून प्रवास केला होता. त्यानंतर या दोन्हही पक्षांमध्ये युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशात राज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने या दोन्हही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
राज्यामध्ये विविध पक्षांमध्ये युती आणि आघाड्या सुरु असताना राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. मुंबईत होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्वाची ठरणार आहे. भेटीमागचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी राज ठाकरे यांनी वयक्तिक कारणासाठी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे.