विशेष

दिल्ली उच्चन्यायालयाने या कारणाने तरुणाला बलात्काराच्या आरोपातून केले मुक्त 

Spread the love

दिल्ली / नवप्रहार मीडिया 

                   जिल्हा सत्र न्यायालयाने बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवलेल्या एका तरुणाला  दिल्ली उच्च न्यायालयाने त्यातून मुक्त केले आहे. त्यांनी  तरुणाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ठेवलेले शारीरिक संबंध ही त्याची दुसरी पत्नी म्हणून ठेवले होते.असा निर्वाळा देत तरुणाला बलात्काराच्या आरोपातून मुक्त केले आहे.

          उपलब्ध माहिती नुसार पीडित तरुणाची 15 वर्षीय तरुणी ही दुसरी पत्नी होती. त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने ती गर्भवती राहिल्याने मुलीच्या आईने तरुणा विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याच्यावर  बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी ट्रायल कोर्टाने मुस्लिम तरुणाच्या बाजुने दिलेल्या निर्णयाला योग्य ठरवले. ट्रायल कोर्टाने आरोपीला आपल्या दुसऱ्या पत्नीशी बलात्कार प्रकरणात दोषी मानण्यास नकार दिला होता.

न्यायालयात न्यायमूर्ती सुरेश कुमार कांत आणि नीना बंसल कृष्णा यांच्या खंडपीठाने म्हटले की, एडिशनल सेशन न्यायाधीशांनी मुलीच्या जबाबाच्या आधारावर निकाल दिला होता. मुलीने दिलेल्या जबाबावरून तिची विवाह या तरुणासोबत डिसेंबर 2014  मध्ये झाला होता. त्यानंतर त्यांच्या शारीरिक संबंध निर्माण झाले होते. हा पॉक्सो अंतर्गत गुन्हा मानता येत नाही, त्यामुळे तरुणाची सुटका करण्यात येत आहे. त्याचबरोबर न्यायालयाने पोलिसांद्वारे दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली.

न्यायालयाने म्हटले की, जेव्हा अल्पवयीन पीड़िता पत्नी होती तेव्हा तिचे वय जवळपास 15  वर्षे होते. तिचा पती व तिच्यामध्ये निर्माण झालेल्या संबंधांना बलात्कार म्हटले जाऊ शकत नाही. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर 2015 मध्ये तरुणावर बलात्काराची गुन्हा दाखल करण्यात आला होता. जेव्हा मुलीच्या आईला समजले की, तिची अल्पवयीन मुलगी गर्भवती आहे, तेव्हा तिने याबाबत तक्रार दाखल केली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) नुसार एखाद्या व्यक्तीने त्याच्या पत्नीशी लैंगिक संबंध बनवणे बलात्कार नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close