दिल्ली मेट्रो नंतर आता दिल्ली बस चा व्हडीओ व्हायरल
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
दिल्ली मेट्रो मध्ये घडणाऱ्या व्हिडीओने मागील काही दिवस धुमाकूळ घातला होता. दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं होत असतात. आता दिल्ली बस मधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन महिलांमध्ये सुरवातीला तू तू – मै मै होते. त्यानंतर त्याच्यात मारामारी होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिल्ली बसमधील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे,
व्हायरल व्हिडिओत दिल्ली बस दिसून येत आहे. या बसमध्ये अनेक प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याच गर्दीत दोन महिलांची बसमधील सीटवर बसण्याच्या कारणावरुन जोरदार वादविवाद होत आहे. त्याच्या सोबत एक तरुणही त्यांच्या भाडंणाचा हिस्सा असलेला दिसून येत आहे. काही वेळात vhidio पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली महिला ही तिच्या समोर उभी असलेल्या महिले सोबत आणि तिच्या बाजूला बसलेल्या तरुणासोबत भांडत आहे.
मात्र ते दोघेही त्या महिलेसोबत भांडत आहे. काही वेळात समोर असलेली महिला खाली बसलेल्या महिलेला मारण्यास सुरुवात करते शिवाय तो तरुणीही त्या महिलेचे बोट जोरात मोडण्याचा पर्यंत करतो, त्यामुळे महिलेला त्रास होताना दिसून येत आहे. सर्व धक्कादायक प्रकार बसमधील सह प्रवाशांनी मोबाईमध्ये कैद केलेला आहे.
दिल्लीम बसमधील व्हिडिओ ”एक्स” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ १७ सप्टेंबर रोजीचा असल्याचे समजते. मात्र व्हिडिओला कमी कालावधीतच लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पोस्ट होताच प्रत्येक यूजरने अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,” त्या तरुणावर कारवाई झाली पाहिजे” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,” कोण चूकीचे कोण बरोबर काय माहिती” तर अजून एका यूजने कमेट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,” फक्त व्हिडिओ पाहा” अशा अनेक बाजूंनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत.



