क्राइम
जबरी चोरी करणाऱ्या आरोपींच्या एलसीबी ने आवळल्या मुसक्या
अमरावती / प्रतिनिधी
पादचारी आणि वाहन धारकांना एकटे पाहून त्यांना धाक दाखवून त्यांच्या जवळील साहित्य हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला आहे.
पोलिस स्टेशन लोणी येथे दाखल अप. क. ३०५ / २२ कलम ३९४,३४ भादवी गुन्हा दाखल होता.
पोलीस अधीक्षक सा, अमरावती (ग्रामीण) यानी जिल्हयात होत असलेल्या जबरी चोरीच्या घटनांना आय बसावा याकरीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर जबरी चोरीचे गुन्हे उपडकीस आणनेबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या.
सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक दिनांक ३१/०३/२०२३ रोजी सदर गुन्हाचा समांतर तपास करीत असताना पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा संकेत अरविंद गजभीये रा. मीलचाल नवी वस्ती बडनेरा पाने त्याचे साथीदारासह केला आहे. अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास आम्ही बडनेरा रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या वाईन शॉप जवळून ताब्यात घेवून सदर नावात विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पुन्हा विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार १. प्रज्वल संजय कैथवास वय २० वर्ष रा. भगतसिंग चौक जुनी वस्ती बडनेरा २. आयुश नरेश मेश्राम वय २२ वर्ष रा एस.वि.आय. कॉलनी, नवी वस्ती बडनेरा यांच्या सोबत पोस्टे लोगी च्या हददीतील पेटोलप जवळ एका दुचाकीवर येत असलेल्या इसमाला अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याचे जवळची डिझेलची कॅन व एक रेडमी कंपणीचा निळया रंगाचा अँड्रॉईड मोबाईल व नगदी १००/ रु घेवून पळून गेले होते असे सांगीतल्याने त्याचे सोबत गुन्हा करतेवेळी असलेल्या दोन साथीदाराचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयाचा पोस्टे लोणी येथील अभिलेखावर अप क ३०५/२२ कलम ३९४,३४ मा दवी प्रमाणे दाखल असून सदर गुन्हा तिन्ही आरोपीतांनी सोबत केल्याचे सांगीतल्याने त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेली मो.सा होन्डा शाईन क्रमांक एम.एच २७ सीडी ८३८९ किमत अंदाजे ६०,०००/रु व गुन्हयात फियादी कडून चोरलेला मोबाईल रेडमी कंपनीचा निळा रंगाचा अँड्रॉईड मोबाईल कि.अं. ८००० रु असा एकुन ६८,००० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीताना पुढिल कार्यवाही कामी पो स्टे लोणी यांचे ताब्यात देण्यात आले.
आरोपी नामे आयुश नरेश मेश्राम वय २२ वर्ष रा एस.बि.आय कॉलनी नवी वस्ती बडनेरा हा पोस्टे नांदगाव खंडेश्वर येथे अप.क्र. ३१४/२०२२ कलम ३०७,३४ भादंवि मध्ये फरार आहे. त्याबाबत माहिती पोलीस स्टेशन नांदगांव खंडेश्वर यांना देण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सो श्री अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक श्री. शशिकांत सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) यांचे नेतृत्त्वात पोलीस उप निरीक्षक संजय शिंदे व त्यांचे पथकातील अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैयद अजमत सैयद शौकत, निलेश डांगोरे, अमोल केंद्रे, कमलेश पाचपोर यांनी केली आहे.