पौष्टिक तृणधान्याच्या माहिती पुस्तिकेचे वाटप करून गोधनी येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा
यवतमाळ:/ प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन दरवर्षी २३ डिसेंबरला ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो.चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबवली,ज्यामुळे त्यांचे शेतकऱ्यांमध्ये अमूल्य योगदान मानले जाते.त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी २००१ पासून हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज गोधनी येथे या निमित्ताने राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्यांच्या माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे उपस्थित महिलांना तृणधान्यांचे महत्त्व आणि आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत प्रा. पंढरी पाठे यांनी मार्गदर्शन केले.सामाजिक कार्यकर्त्या विद्या परचाके यांनी महिलांना तृणधान्याबद्दल जनजागृती करत त्याचा आहारातील समावेश कसा करावा याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाला आदिवासी नेत्या माधुरी अंजीकर,विद्या परचाके,लीना बोरकर,कॉम्रेड सचिन मनवर,प्रेम गोसावी,लक्ष्मी आडे,संगीता खोब्रागडे,सुरेखा भगत,ज्ञानेश्वर कुंभेकर, सुधाकर लोणकर,अनंता सिडाम,रुपेश रामगडे,प्रकाश कांबळे,यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाने ग्रामीण भागातील शेतकरी महिलांमध्ये पौष्टिक तृणधान्याविषयी जागरूकता निर्माण केली आणि शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले.
🚩माऊली.